सिमला, घेवडा, मटारच्या भावात वाढ

सिमला, घेवडा, मटारच्या भावात वाढ

मार्केट यार्ड, ता. १२ : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १२) राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याची सुमारे ११० ट्रक आवक झाली होती. अवकाळी पाऊस आणि सोमवारी लोकसभेच्या मतदानामुळे बाजारात फळभाज्यांची आवक वाढली होती. त्यामुळे सिमला, घेवडा, मटारच्या भावात १० टक्क्यांनी वाढ झाली होती, तर शेवगा, भुईमूग शेंगांच्या मागणीत घट झाल्याने भावात वाढ असून अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर होते.

विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १० ते १२ टेम्पो, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून तोतापुरी कैरी ४ हजार टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी प्रत्येकी ४ ते ५ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ३ ते ४ टेम्पो, हिमाचल प्रदेशातून मटार ५ ट्रक, कर्नाटक पावटा ३ टेम्पो आणि भुईमूग शेंगा बेळगाववरून २ टेम्पो, तर आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा ५ ते ६ टेम्पो, मध्यप्रदेशातून लसूण सुमारे ९ टेम्पो आवक झाली होती.

तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ५०० ते ६०० गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी ७ ते ८ टेम्पो, टोमॅटो १० हजार क्रेट, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२, काकडी ७ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंगा १२५ गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गावरान कैरी ५-६ टेम्पो, शेवगा २ ते ३ टेम्पो, कांदा सुमारे ८० ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४५ टेम्पो आवक झाली होती.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : १००-१८०, बटाटा : २००-२६०, लसूण : ९००-२०००, आले सातारी : १०००-११००, भेंडी : २००-४००, गवार : ३००-४००, टोमॅटो : ८०-१३०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ५००, दुधी भोपळा : २००-२५०, चवळी : २००-२५०, काकडी : १००-२००, कारली : हिरवी ३००-४००, पांढरी : २००-२५०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १६०-२००, कोबी : ८०-१२०, वांगी : २००-३००, डिंगरी : २००-२२०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ५००- ६००, तोंडली : कळी : ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : २००- ३००, गाजर : २००-२५०, वालवर : ३५०-४००, बीट : १४०-१५०, घेवडा : ८००-९००, कोहळा : १००-१५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : १५०-२००, भुईमूग शेंग : ५००, मटार (परराज्य) : १०००, पावटा : ५००-६००, तांबडा भोपळा : १००-२००, कैरी तोतापुरी : ३००-३०० सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.

पालेभाज्यांच्या भावात घट
पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटयार्डात कोथिंबीर, मेथी, कांदापात, चुकाच्या भावात ५ ते १० टक्क्यांनी घट झाली होती. तर इतर पालेभाज्यांच्या भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी (ता. १२) कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुडी तर मेथीची ६० हजार जुडींची आवक झाली होती. पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : १००-१५००, शेपू : ८००-१०००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ४००-७००, करडई : ३००- ७००, पुदिना : ३००-६००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ४००- ७००, चुका : ५००-८००, चवळई : ४००-७००, पालक : ८००-१५००.

मोसंबी आणि लिंबाच्या भावात घट
गुलटेकडी मार्केटयार्डातील फळबाजारात रविवारी चिक्कूच्या भावात वाढ झाली असून मोसंबी आणि लिंबाच्या भावात घट झाली आहे. तर अननस, डाळिंब, संत्री, कलिंगड, खरबूज आणि पपईचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडी येथील मार्केट यार्ड फळबाजारात रविवारी (ता. १२) मोसंबी २० ते २५ टन, अननस ६ ट्रक, संत्री ४ ते ५ टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई ७ ते ८ टेम्पो, लिंबांची सुमारे दीड हजार ते दोन हजार गोणी, कलिंगड २० ते ३० टेम्पो, खरबूज ९ ते १० टेम्पो, चिक्कू दोन हजार बॉक्स इतकी आवक झाली होती, तर कोकणातील हापूस आंब्याची सुमारे दीड ते दोन हजार पेट्या इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे- लिंबे (प्रतिगोणी) : ३००-१३००, मोसंबी : (३ डझन): १८०- ३२०, (४ डझन) : ७०-२००, संत्री : (१० किलो) : २००-१०००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-२५, आरक्ता: १०-५०, गणेश : ५-२५, कलिंगड : ५-१५, खरबूज : २२-२८, पपई : ८-१५, चिक्कू (दहा किलो) : १००-५००, अननस (१ डझन) १००-६००. रत्नागिरी हापूस (कच्चा) ४ ते ७ डझन १५०० ते ३००० रुपये.

फुलांचे भाव स्थिर
पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्डात (रविवारी ता. १२) बाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. पुणे जिल्ह्यातच पाऊस झाल्याने ओल्या मालाचे प्रमाणही कमी आहे. फुलांची आवक ही सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी असल्याने सर्वच फुलांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-६०, गुलछडी : १४०-१८०, अ‍ॅष्टर : जुडी ३०-४०, शेवंती : १५०-२५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ४०-६०, गुलछडी काडी : ५०-१००, डच गुलाब (२० नग) : ८०-१२०, जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : १००-१५०, शेवंती काडी १५०-२५०, लिलियम (१० काड्या) ८००-१२००, आॅर्चिड ४००-५००.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com