लालचुटूक लिचीचा हंगाम सुरू

लालचुटूक लिचीचा हंगाम सुरू

मार्केट यार्ड, ता. १५ : रंगाने लाल, आकाराने स्ट्रॉबेरीसारखी, आतुन रसाळ गोड चवीचे गर असणाऱ्या लिचीचा हंगाम सुरू झाला आहे. घाऊक बाजारात एक किलो लिचीचे दर ४०० ते ४५० रुपये आहेत. लिचीला मागणी चांगली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

बाजारात पहिल्या टप्यात पश्चिम बंगालमधून लिचीची आवक मार्केट यार्डातील फळबाजारात सुरू झाली आहे. लालचुटूक लिचीचा हंगाम जुलै महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. बाजारात दररोज लिचीच्या तीनशे ते चारशे पेट्यांची आवक होत आहे. एका पेटीत १० किलो लिची असून, घाऊक बाजारात दहा किलो लिचीला प्रतवारीनुसार २,२०० ते २,७०० रुपये दर मिळाले आहेत. मागील वर्षी दहा किलो लिचीला दोन हजार ते २४०० रुपये दर मिळाले होते.

सुरुवातीच्या काळात यंदा लिचीच्या दरात वाढ झाली असल्याची माहिती मार्केट यार्डातील लिचीचे व्यापारी राजेश परदेशी यांनी दिली. २१ मे नंतर बिहारमधून लिचीची आवक सुरू होईल. लिचीचा हंगाम साधारणपणे १५ जुलैपर्यंत सुरू राहील. पावसाळा सुरू झाल्यानंतर लिचीचा हंगाम संपतो. हंगामाच्या शेवटच्या टप्यात पंजाबमधील पठाणकोट परिसरातून लिचीची आवक होते.
-------
बाजारातून सोलापूर, नगर, हुबळी, धारवाड येथील फळबाजारात लिची विक्रीस पाठविली जात आहे.
उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वेला गर्दी आहे. रेल्वे गाड्या विलंबाने पोहोचत असल्याने लिचीच्या प्रतवारीवर परिणाम होत आहे. त्यावर उपाय म्हणून सध्या कोलकात्यातून विमानाने लिचीची आवक होत असून, वाहतूक खर्चामुळे लिचीचे दर तेजीत आहेत. लिचीला मागणी चांगली आहे. - राजेश परदेशी, व्यापारी, मार्केट यार्ड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com