कांदा, काकडी, फ्लॉवरच्या भावात वाढ

कांदा, काकडी, फ्लॉवरच्या भावात वाढ

मार्केट यार्ड, ता. ९ : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ९) राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याची सुमारे ८० ते ९० ट्रक आवक झाली होती. राज्यात सर्वत्र पाऊस असल्याने मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारात काही प्रमाणात आवक घटली होती. तसेच मागणी जास्त असल्याने कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची, काकडी, फ्लॉवर, शेवगा, गाजराच्या भावात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर टोमॅटो, घेवडा आवक जास्त असल्याने भावात घट झाली आहे. अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर होते.
विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे ८ ते १० टेम्पो, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून तोतापुरी कैरी २ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी प्रत्येकी ३ ते ४ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ३-४ टेम्पो, हिमाचल प्रदेशातून मटार ४ ते ५ टेम्पो, कर्नाटक पावटा २ टेम्पो, तर आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, इंदौर २ टेम्पो गाजर, मध्यप्रदेशातून लसूण सुमारे ९ टेम्पो आवक झाली होती.
तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ५०० ते ६०० गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो १० हजार क्रेट, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ५ ते ६ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंगा ३०० गोणी, गाजर २ ते ३ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, गावरान कैरी ४ ते ५ टेम्पो, कांदा सुमारे १४० ट्रक, इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४० टेम्पो आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा :२५०-३००, बटाटा : २००-२६०, लसूण : ९००-२०००, आले सातारी : १०००-१२००, भेंडी : ३००-५००, गवार : ३००-५००, टोमॅटो : २५०-३००, दोडका : ४००-६००, हिरवी मिरची : ४५०-६००, दुधी भोपळा : २००-३००, चवळी : २००-३००, काकडी : २००-२५०, कारली : हिरवी ४००-५००, पांढरी : २००-३००, पापडी : ४५०-५००, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : २००-२२०, कोबी : १००-१४०, वांगी : १५०-३५०, डिंगरी : २००-३००, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ५००- ५५०, तोंडली : कळी : ३००-४००, जाड : १६०-१८०, शेवगा : ६००, गाजर : २८०-३००, वालवर : ५००-५५०, बीट : १००-१२०, घेवडा : ८००-९००, कोहळा : १००-१५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग शेंगा : ४००-५५०, मटार (परराज्य) : १०००-१३००, पावटा : ६००-६५०, तांबडा भोपळा : १००-१५०, कैरी तोतापुरी : ४००-४५०, गावरान : १५०-२५० सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.


पालेभाज्यांची आवक कमी
राज्यात सर्वत्र पाऊस सुरू असल्याने बाजारात दर्जेदार पालेभाज्यांची आवक कमी आहे. ओल्या आणि डागी मालाची आवक होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कोथिंबीर आणि मेथीचे दर ४० ते ५० रुपयांवर पोहोचले आहेत. तर कांदापात व चाकवतचे दर ४० रुपयांवर गेले आहेत. अन्य पालेभाज्यांचे दर ३० रुपये गड्डीवर गेले आहेत. पुढील महिनाभर पालेभाज्यांचे हेच दर कायम राहतील, अशी शक्यता पालेभाज्या विक्रेत्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कोथिंबीर, मेथी, कांदापात आवक कमी असल्याने भावात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर इतर सर्व प्रकारच्या पालेभाज्याही तेजीत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तरकारी विभागात रविवारी (ता. ९) कोथिंबिरीची सुमारे १ लाख जुडी तर मेथीची ३० हजार जुडींची आवक झाली होती.
घाऊक बाजारातील पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १५००-३५००, मेथी : १५००-२५००, शेपू : ८००-१५००, कांदापात : १०००-२०००, चाकवत : ८००-१५००, करडई : ४००- १०००, पुदिना : ५००-१०००, अंबाडी : ४००-८००, मुळे : ८००-२०००, राजगिरा : ४००- ७००, चुका : ६००-१०००, चवळई : ४००-७००, पालक : १५००-२०००.

फळांचे भाव तेजीत
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डातील फळबाजारात रविवारी मोसंबी, डाळिंब, पपईच्या भावात वाढ झाली असून खरबूज आणि कलिंगडाच्या भावात घट झाली आहे. पावसामुळे काही
प्रमाणात आवक घटल्याने फळांचे भाव तेजीत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडी येथील मार्केट यार्ड फळबाजारात रविवारी (ता. ९) मोसंबी २० ते २५ टन, अननस ६ ट्रक, संत्री २ ते ३ टन, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई ४ ते ५ टेम्पो, लिंबांची सुमारे १००० ते १२०० गोणी, कलिंगड १० ते १५ टेम्पो, खरबूज १० ते १२ टेम्पो, चिक्कू दोन हजार गोणी इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे- लिंबू (प्रतिगोणी) : ३००-१४००, मोसंबी : (३ डझन): २६०- ३७०, (४ डझन) : १२०-२५०, संत्री : (१० किलो) : २००-८००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ३०-१५०, आरक्ता: १०-६०, गणेश : ५-२५, कलिंगड : ५-७, खरबूज : १०- १२, पपई : १५-२५, चिक्कू (दहा किलो) : १००-६००, अननस (१ डझन) १००-६००.


सुक्या फुलांना मागणी
बाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक साधारण आहे. पावसाचा फटका बसल्याने बाजारात निम्म्याहून अधिक प्रमाणात ओली फुले दाखल होत आहे. परिणामी, त्यांच्या भावात घसरण झाली आहे. सुक्या फुलांना मागणी व दर टिकून असल्याची माहिती फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-१००, गुलछडी : ५०-८०, अ‍स्टर : जुडी २०-४०, सुट्टा १००-१५०, शेवंती : ५०-१००, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-३०, गुलछडी काडी : ३०-५०, डच गुलाब (२० नग) : ३०-८०, जरबेरा : १०-३०, कार्नेशियन : १००-१२०, शेवंती काडी २००-३००, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ३००-५००़, जिप्सोफिला : ८०-१००, मोगरा : १००-२००.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com