मासळीचे भाव तेजीतच

मासळीचे भाव तेजीतच

मार्केट यार्ड, ता. ९ : पावसाळ्याच्या तोंडावर मासेमारीचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे गणेश पेठेतील बाजारात मासळीची आवक मंदावली आहे. त्यातुलनेत मागणी चांगली असल्याने महिनाभरात कोळंबी वगळता मासळीचे भाव ४० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. तर चिकन, मटण व गावरान अंड्यांचे भाव स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मागणी व पुरवठा कायम असल्याने चिकन, गावरान अंडी व मटणाचे भाव टिकून होते.
बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी १० टन, खाडीची मासळी २०० किलो आणि नदीच्या मासळीची ७०० टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे २२ टन आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर)- पापलेट : कापरी : २०००, मोठे : १६००, मध्यम : १३००, लहान : ११००, भिला : ११००, हलवा : ९००-१०००, सुरमई : १०००-१६००, रावस : १०००-१०००, घोळ : ९००-१०००, करली : ५००-५५०, पाला : १४००-१५००, वाम : पिवळी : १०००-१५००, काळी : ५००-६००, ओले बोंबील : २८०-३५०. कोळंबी : लहान : २००-२४०, मोठी : ३६०-५५०, जम्बो प्रॉन्स : १६००-१८००, किंग प्रॉन्स : ७५०-८००, लॉबस्टर : १८००-२०००, मोरी : १००-४५०, मांदेली : १६०-२००, राणीमासा : ३००-४००, खेकडे : ३५०-४००, चिंबोऱ्या‍ : ६००-७००.
खाडीची मासळी : सौंदाळे : ३००, खापी : ३००, तांबोशी : ५००-५५०, लेपा : २४०-२८०, बांगडा : २८०-३००, शेवटे : २४०, पेडवी : १४०, बेळुंजी : २००, तिसऱ्या : २००-२४०, तारली : २००.
नदीतील मासळी : रहू : १६०, कतला : १६०, मरळ : ३२०, शिवडा : २००, खवली : २४०, आम्ळी : १४०, खेकडे : ३५०, चिलापी : ८०-१००, वाम : ४००-४५०.
मटण : बोकड : ७४०, बोलाई : ७४०, खिमा : ७४०, कलेजी : ७८०.
चिकन : २६०, लेगपीस : ३२०, जिवंत कोंबडी : १८०, बोनलेस : ३५०.
अंडी : गावरान (शेकडा) : ८९०, डझन : १२०, प्रतिनग : १०.
इंग्लिश (शेकडा) : ६००, डझन : ८४, प्रतिनग : ७.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com