

मार्केट यार्ड, ता. १५ : देशाची पूर्व व पश्चिम किनारपट्टीहून गणेश पेठेतील बाजारात मासळी दाखल होत आहे. सात दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर मासळीला मागणी वाढली आहे. त्यातुलनेत आवक कमी असल्याने मासळीच्या भावात १० टक्के वाढ झाली आहे. बाजारातील मागणीनुसार पुरवठा होत असल्याने चिकन, मटण आणि अंड्यांचे भाव स्थिर होते.
मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची १५ टन, खाडीच्या मासळीची ४०० किलो आणि नदीच्या मासळीची ५०० किलो आवक झाली. आंध्रप्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची २५ टन आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)- पापलेट : कापरी : १६००-१८००, मोठे : १४००-१५००, मध्यम : १०००-१२००, लहान : ७००-८००, भिला : ५००-६००, हलवा : ५००-६००, सुरमई : लहान : ४००-५००, मोठी सुरमई : ६००-७००, रावस : ६००-७००, घोळ : ६००-७००, करली : ३००-३५०, करंदी (बिगर सोललेली) : १५०-२००, पाला : लहान : १०००-१२००, मोठा : १६००-१८००. वाम : पिवळी : ७००-८००, काळी : ४००-४५०, ओले बोंबील : १५०-२००. कोळंबी : लहान : १४०-२००, मोठी : ३००-४५०, जम्बो प्रॉन्स : १५००-१६००, किंग प्रॉन्स : ६००-७००, लॉबस्टर : १८००-२०००, मोरी : ३००-३५०, राणीमासा : १६०-२००, खेकडे : २५०-३००, चिंबोऱ्या : ६००-७००.
खाडीची मासळी : खापी : २५०-३००, नगली : ४००-४५०, तांबोशी : ५००-५५०, लेपा : १६०-२००, बांगडा : २२०-२८०, शेवटे : २००-२४०, बेळुंजी : १६०-१८०, तिसऱ्या : २००-२५०. नदीतील मासळी : रहू : १६०-१८०, कतला : १६०-१८०, मरळ : ४५०-५००, शिवडा : २००-२४०, खवली : १६०-२००, आम्ळी : १००-१४०, खेकडे : ३००-३५०, चिलापी : ६०-१६०, वाम : ५५०.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.