शेंगदाण्याच्या भावात वाढ;
साबुदाणा, भगर स्वस्त

शेंगदाण्याच्या भावात वाढ; साबुदाणा, भगर स्वस्त

Published on

मार्केट यार्ड, ता. २५ : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भगर, साबुदाणा आणि शेंगदाणा या उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थांना मागणी वाढली आहे. मागणी जास्त असल्याने शेंगदाण्याच्या भावात क्विंटलमागे दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे. तर मागणीच्या तुलनेत आवक जास्त होत असल्यामुळे घाऊक बाजारात साबुदाणा व भगरीच्या भावात क्विंटलमागे शंभर ते दिडशे रुपयांनी घसरण झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
घाऊक बाजारात उत्तम प्रतीच्या भगरीला प्रती किलोस ८५ ते ९० रुपये, तर दोन नंबर मालास ८० ते ८५ रुपये भाव मिळाला. देशात केवळ तमिळनाडू येथील सेलम भागात साबुदाण्याचे उत्पादन घेतले जाते. तेथून सगळीकडे माल निर्यात होत असतो. बाजारात दिवसाला साबुदाण्याची १५० ते २०० टनांहून अधिक आवक होत आहे. सुपर क्वालिटीच्या साबुदाण्याला प्रती किलोस ५५ रुपये भाव मिळत आहे. तर, दोन नंबरच्या साबुदाण्याला प्रतिकिलोस ५० ते ५२ रुपये भाव मिळत असल्याची माहिती व्यापारी अशोक लोढा यांनी दिली.
महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा, कर्नाटक आणि छत्तीसगड येथे भगरीचे उत्पादन घेतले जाते. बाजारात दररोज ३० ते ४० टन भगरची आवक होत आहे. मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून घुंगरू, स्पॅनिश, जाडा, टीजे शेंगदाणा बाजारात दाखल होत आहे. बाजारात शेंगदाण्याची आवकही चांगली असून दर्जाही चांगली आहे. घाऊक बाजारात घुंगरू ९० ते १०० रुपये, स्पॅनिश ११० ते ११७ रुपये, जाडा ९० ते १०० रुपये तर टीजे शेंगदाण्याची ७२ ते ७५ रुपये किलो दराने विक्री सुरू असल्याचे लोढा यांनी सांगितले.

बहुतांश शेंगदाणा खाद्यतेलासह मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने शेंगदाण्याच्या दरात क्विंटलमागे दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. शेंगदाण्याला मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.
-गणेश चोरडिया, व्यापारी, मार्केट यार्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com