संत्रीला उच्चांकी २२२ रुपये भाव

संत्रीला उच्चांकी २२२ रुपये भाव

Published on

मार्केट यार्ड, ता. १३ : पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भोसे येथील शेतकरी विजय भिकाजी शिंदे यांनी आणलेल्या संत्र्याला रविवारी उच्चांकी २२२ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. गेल्यावर्षी संत्र्याला प्रतिकिलो १०० ते १५० रुपयांपर्यंत भाव मिळाला होता.
अहिल्यानगर येथील संत्र्याचा हंगाम सुरू झाला आहे. बाजारात येणारी संत्री चवीला गोड आणि रंग चांगला असल्याने शहर उपनगरासह गोवा, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, रायगड, रत्नागिरी, लोणावळा येथून मोठी मागणी आहे. फळबाजारात अहिल्यानगरमधून १५-२० टन संत्र्याची आवक होत आहे. अहिल्यानगर भागातील पिंपळी, उजनी, करंडी, पारनेर, काथुर्डी या भागातून संत्र्याची अवाक होत आहे.
नागपूर भागातील संत्र्यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अहिल्यानगर भागातून येणाऱ्या संत्र्याचा दर्जा चांगला आहे. उन्हाळ्यामुळे संत्र्याची मागणी वाढलेली आहे. तसेच त्यामध्ये गोडीही उतरली असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी युवराज काची
यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com