सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर
मार्केट यार्ड, ता. ६ : गुलटेकडी येथील मार्केटयार्डात बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने रविवारी भावात ५ ते १० टक्क्यांनी घसरण झाली तर इतर सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मार्केटयार्डात रविवारी राज्यासह परराज्यातून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी चार टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून शेवगा चार टेम्पो, इंदूर येथून गाजर १० टेम्पो, कर्नाटकातून घेवडा तीन टेम्पो, हिमाचल प्रदेशातून मटार तीन टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूतून कैरी तीन टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची १० टेम्पो तर इंदूर, आग्रा व स्थानिक भागातून बटाट्याची ४५ टेम्पो आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आले ५०० गोणी, भेंडी सात टेम्पो, गवार सहा टेम्पो, टोमॅटो १० हजार क्रेट, हिरवी मिरची चार टेम्पो, काकडी सहा टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी सहा टेम्पो, ढोबळी मिरची आठ टेम्पो, भुईमूग शेंगा १२५ गोणी, तांबडा भोपळा १२ टेम्पो तर कांद्यांची सुमारे ८० टेम्पो आवक झाल्याची माहिती ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे १० किलोचे भाव : कांदा : १५०-१८०, बटाटा : १४०-२००, लसूण : ३००-९००, आले सातारी : १००-२००, भेंडी : ४५०-५००, गवार : ९००-१०००, टोमॅटो : १५०-१८०, दोडका : ४००-४५०, हिरवी मिरची : ३५०-५००, दुधी भोपळा : २००-२५०, चवळी : ३५०-४००, काकडी : २००-२२०, कारली : हिरवी : ४००-४५०, पांढरी : ६००-६५०, पापडी : ७००-८००, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : २५०-३००, कोबी : १२०-१४०, वांगी : ५००-५५०, डिंगरी : ४००-५००, नवलकोल : २००-२५०, ढोबळी मिरची : ५००-५५०, तोंडली : कळी : ३५०-४००, जाड : १५०-२००, शेवगा : ५५०-६००, गाजर : १२०-१४०, वालवर : ८५०-९००, बीट : १५०-१८०, घेवडा : ७५०-८००, कोहळा : १६०-२००, आर्वी : ३५०-४००, घोसावळे : ४००-४५०, ढेमसे : ५००-५५०, भुईमूग शेंग : ४५०-५००, मटार : परराज्य : १२००-१३००, पावटा : ३५०-४००, तांबडा भोपळा : ८०-१००, तोतापुरी कैरी : ५०-२५०, सुरण : ४००-४५०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : २०००-२५००.
कोथींबीर, कांदापात, करडईच्या भावात वाढ
मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक घटल्याने कोथींबीर, कांदापात आणि करडईच्या भावात वाढ झाली असून शेपू आणि पालकच्या भावात घट झाली. मेथी, चाकवत, पुदीना, अंबाडी, मुळे, राजगिरा, चुका, चवळईचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोथिंबिरीची सुमारे एक लाख जुडी तर मेथीची ६० हजार जुडींची आवक झाली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १०००-२०००, मेथी : १०००-१५००, शेपू : ८००-१२००, कांदापात : १०००-१८००, चाकवत : ५००-८००, करडई : ५००-८००, पुदिना : ५००-१०००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ४००-७००, चुका : ५००-१०००, चवळई : ३००-७००, पालक : १५००-१५००.
डाळिंब महागले
फळबाजारात डाळिंबाची आवक कमी झाल्याने भावात १० टक्क्यांनी वाढ झाली तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फळबाजारात रविवारी मोसंबीची ४० टन, संत्रा दीड टन, डाळिंब ४५ टन, पपई २५ टेम्पो, लिंबांची सुमारे दोन हजार गोणी, कलिंगड पाच टेम्पो, खरबूज पाच टेम्पो, चिक्कू १०० गोणी, पपई २५ टेम्पो, पेरू ७०० क्रेटस, अननस पाच ट्रक तर सीताफळांची तीन टन आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे - लिंबे (प्रतिगोणी) : १००-३५०, मोसंबी : (३ डझन) : १८०-२२०, (४ डझन) : ६०-१६०, संत्रा : (१० किलो) : २००-७००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ६०-२२०, आरक्ता : १०-५०, गणेश : ५-३०, कलिंगड : १२-२०, खरबूज : २०-३०, पपई : १२-२०, चिक्कू (१० किलो) : १००-६००, पेरू (२० किलो) : ३००-५००, अननस (१ डझन) : १००-६००, सीताफळ (१ किलो) : २०-१५०.
फुलांच्या भावात वाढ
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस फुलांची आवक आणि मागणी चांगली राहिली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या भावात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली; मात्र सद्यःस्थितीत मागणी कमी असल्याची माहिती फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : ५०-७०, गुलछडी : १००-१५०, अॅष्टर : जुडी : २०-३०, सुट्टा : ८०-१००, कापरी : ५०-१००, शेवंती : ९०-१५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : २०-३०, डच गुलाब (२० नग) : १००-१५०, जर्बेरा : ३०-४०, कार्नेशियन : १५०-२००, शेवंती काडी : २००-३००, लिलियम (१० काड्या) : ८००-१०००, आॅर्चिड : ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १००-१२०, जिप्सोफिला : २००-३००, मोगरा : ५००-७००.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.