शेवगा, घेवडा, मटार, फ्लॉवर, पावटाच्या भावात घट
मार्केट यार्ड, ता. २० : पावसाला उघडीप मिळाल्याने गुलटेकडी येथील मार्केटयार्डात काही प्रमाणात आवक वाढल्याने शेवगा, घेवडा, मटार, फ्लॉवर, पावट्याच्या भावात ५ ते १० टक्क्यांनी घट झाली तर हिरवी मिरचीच्या भावात वाढ झाली आहे. इतर सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मार्केटयार्डात रविवारी राज्यासह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी पाच टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून शेवगा चार टेम्पो, इंदूर येथून गाजर १० टेम्पो, कर्नाटक, गुजरात आणि उत्तरप्रदेशातून हिरवी मिरची आठ टेम्पो, गुजरात, कर्नाटकातून घेवडा पाच टेम्पो आणि पावटा सहा टेम्पो, आंध्रप्रदेश येथून कैरी दोन टेम्पो, मध्यप्रदेशातून लसणाची १० टेम्पो तर इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाट्याची ३५ टेम्पो आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आले ६०० गोणी, भेंडी सात टेम्पो, गवार पाच टेम्पो, टोमॅटो १० हजार क्रेट, हिरवी मिरची पाच टेम्पो, काकडी सात टेम्पो, फ्लॉवर १५ टेम्पो, कोबी पाच टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, भुईमूग शेंगा १२५ गोणी, तांबडा भोपळा १२ टेम्पो, मटार ८०० गोणी, कांद्यांची ६० टेम्पो आवक झाली, अशी माहिती ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे १० किलोचे भाव : कांदा : १३०-१६०, बटाटा : १३०-१९०, लसूण : ३५०-९५०, आले सातारी : ३००, भेंडी : ३००-४५०, गवार : ६००-८००, टोमॅटो : १००-१२०, दोडका : ३००-५००, हिरवी मिरची : ७००-७५०, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २५०-३००, काकडी : २००-२५०, कारली : हिरवी : ३००-३५०, पांढरी : २००-२५०, पापडी : ३५०-४००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : १००-१२०, वांगी : ३००-४५०, डिंगरी : ४००-४५०, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : ५००-५५०, तोंडली : कळी : ३५०-४००, जाड : २००-२२०, शेवगा : ३००-४००, गाजर : २००-३००, वालवर : ५००-६००, बीट : २००-२५०, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ५००-६००, मटार : स्थानिक मटार : ९००-१०००, पावटा : ३००-३६०, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : ३००-३५०, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.
मेथी, कांदापात स्वस्त
पालेभाज्यांची आवक वाढली होती. त्यामुळे मेथी, कांदापात, शेपू, करडईच्या भावात घट झाली. मुळे, पालकच्या भावात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली तर सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे भाव स्थिर होते. घाऊक बाजारात कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुडी तर मेथीची ८० हजार जुडींची आवक झाली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ५०० ते १०००, मेथी : ५००-१०००, शेपू : ४००-७००, कांदापात : ८००-१५००, चाकवत : ४००-६००, करडई : ३००-६००, पुदिना : ५००-६००, अंबाडी : ३००-६००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ३००-७००, चुका : ३००-७००, चवळई : ३००-६००, पालक : १२००-१५००.
कलिंगड, पपई, खरबुजाच्या भावात वाढ
फळबाजारात काही फळांची आवक वाढली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर फळांना मागणीदेखील चांगली वाढली आहे. त्यामुळे कलिंगड, पपई, खरबूज, डाळिंबाच्या भावात १० ते १५ टक्के वाढ झाली तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मार्केटयार्डातील फळबाजारात रविवारी मोसंबी ५० टन, संत्रा एक टन, डाळिंब ५० टन, पपई ४० टेम्पो, लिंबांची सुमारे १५०० गोणी, कलिंगड तीन टेम्पो, खरबूज पाच टेम्पो, चिक्कू ३०० गोणी, पेरू ८०० क्रेटस, अननस चार ट्रक तर सीताफळांची १२ टन, जांभूळांची सहा पिकअप आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे- लिंबे (प्रतिगोणी) : २००-४००, मोसंबी : (३ डझन) : १५०-२८०, (४ डझन) : ४०-१२०, संत्रा : (१० किलो) : १५०-७००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ८०-२५०, आरक्ता : १०-६०, गणेश : १०-४०, कलिंगड : १५-२५, खरबूज :
२०-३५, पपई : २०-३५, चिक्कू (१० किलो) : १००-६००, पेरू (२० किलो) : ३००-५००, अननस (१ डझन): १००-७००, सीताफळ (१ किलो) : १५-१२०. जांभूळ ८० ते १२०.
सर्व प्रकारच्या फुलांच्या भावात घट
फूलबाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. आषाढ महिन्यामुळे ग्राहक कमी असल्याने सर्व प्रकारच्या फुलांच्या भावात १० ते २० टक्क्यांनी घट झाली, अशी माहिती फुलांचे अडते सागर भोसले यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-४०, गुलछडी : २०-४०, अॅष्टर : जुडी : ३०-३५, सुट्टा : १००-१२०, कापरी : ३०-५०, शेवंती : ४०-६०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-३०, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) : ५०-८०, जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : १००-१५०, शेवंती काडी : २००-३००, लिलियम (१० काड्या) : ८००-१०००, ऑर्चिड : ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१००, जिप्सोफिला : २००-३००, जुई : ३००-४००.