चातुर्मास विशेष
भौतिकवादी विचारसरणीमुळे समाजाचे नुकसान
प. पू. चैतन्यश्रीजी म. सा.!
समाजातील वाढती भौतिकवादी विचारसरणी, मोबाईलचा अतिवापर आणि वाईट संगतीमुळे समाजाचे नुकसान होत आहे. या वस्तू आपल्याला प्रभावित करू शकतात, पण त्या आपली ओळख बनवू शकत नाहीत.
मोबाईल एक उपयुक्त वस्तू आहे, परंतु आपण त्याचा योग्य वापर करण्याऐवजी त्याचा दुरुपयोग जास्त करतो. आज लोक रील्स बघता बघता आपल्या डोळ्यांची लाज हरवून बसले आहेत. असे स्टेटस ठेवतात की दुसऱ्यांशी नजरही मिळवू शकत नाहीत. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर आपल्या आरोग्याला हानी पोहोचवतो आणि आपले संबंध बिघडवतो, कारण आपण डिजिटल जगाशी जोडले जाण्याच्या नादात आपल्या कुटुंबापासून आणि मित्रांपासून दूर जात आहोत.
चुकीचे साहित्य वाचल्याने आपली बुद्धी आणि मन खराब होते. अशा साहित्यापासून दूर राहिले पाहिजे. जे आपले संस्कार नष्ट करू शकते. चुकीच्या व्यक्तीच्या संगतीपासून नेहमी दूर राहायला हवे. या पंचम आऱ्याची हीच विशेषता आहे की, लोक जे करायला हवे ते करत नाहीत आणि जे करायला नको ते करतात.
आपल्या मुलांना धार्मिक स्थळांवर आणा, यामुळे त्यांचे भविष्य सुधारेल. जैन आगमांमधील तीन मनोरथांचे चिंतन करावे. ज्यात एक मनोरथ ‘आरंभ-परिग्रहातून निवृत्त होणे’ आहे. आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळते. आरंभ-परिग्रहाच्या चक्रात आपले भव-भ्रमण वाढते.
आपण जुन्या शब्दांना आणि गोष्टींनाही जपून ठेवतो, हा एक प्रकारचा परिग्रहच आहे. सुख ‘प्लस’मध्ये नाही, तर ‘मायनस’मध्ये आहे. म्हणजे, गोष्टी जोडण्यात नाही तर, त्यांचा त्याग करण्यात आहे. ग्रह कुपीत झाला तर मंत्रांनी शांत केला जाऊ शकतो, पण परिग्रहाची भूक कधीही शांत होत नाही.
आयुष्यभर धावत धावत आपण इतका परिग्रह गोळा करतो, पण शेवटी स्मशानात हे सर्व इथेच राहून जाते. आपल्याला लहान सुरुवात करावी लागेल, तरच आपण शिखरापर्यंत पोहोचू शकतो. ‘जिथे आसक्ती, तिथे उत्पत्ती’ हे तत्त्वज्ञान स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, जर शेवटच्या क्षणी मन परिग्रहात राहिले तर, आपण त्याच योनीत जन्म घेऊ शकतो.
(शब्दांकन : प्रवीण डोके)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.