
खरे सुख आत्मशोधात
– चैतन्यश्रीजी म.सा.
आपण अनेकदा बाहेरच्या सुखाच्या मागे धावतो, पण खरे सुख आपल्या आतच लपलेले असते. जसं कस्तुरी मृगाच्या शरीरातच कस्तुरी असते, तरी तो तिच्या सुगंधामागे जंगलभर भटकतो, तसं आपलंही होतं. आपल्याला वाटतं की सुख बाहेर कुठेतरी आहे, पण ते आपल्या मनातच असतं.
आपण इतरांना बदलण्याचा प्रयत्न करतो, पण आधी स्वतःत बदल घडवणं गरजेचं आहे. आपण इतरांच्या चुका बघून दुःखी होत नाही, तर त्यांच्या वागणुकीचा आपल्यावर होणाऱ्या परिणामामुळे दुःखी होतो. जीवनात आलेल्या प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. खरे सुख कोणाकडून मिळत नाही, तर ते स्वतःच्या आत्मदर्शनातून मिळते. जो खरा साधक आहे, तो हे जाणतो की आज नाही तर उद्या नक्कीच सुख मिळेल.
जगाची मोहामाया सोडून ईश्वराच्या शोधात निघतो, तोच खरा साधक आहे. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली राहणाऱ्या साधकाला अधःपात होण्याची भीती राहत नाही. मन, वाणी आणि शरीर यावर संयम ठेवणे खूप आवश्यक आहे. मनाला कुठेही भटकू न देणे, विचारपूर्वक आणि सौम्य शब्द बोलणे, तसेच कुठल्याही जिवाला इजा न होईल याची काळजी घेणे हाच खरा संयम आहे.
सुख हे क्षणिक असते आणि दुःखाला कधीच अंत नसतो. आजार, वृद्धत्व आणि मृत्यू कधी येतील सांगता येत नाही, म्हणून संयम पाळणं खूप महत्त्वाचं आहे. संयम केवळ शरीरापुरता नसून आपल्या मन आणि भावना यांच्याशीही जोडलेला असतो. जोपर्यंत आपल्याला भावनांवर संयम ठेवता येत नाही, तोपर्यंत बाहेरून कितीही प्रयत्न केले तरी ते अपूर्णच राहतात.
(शब्दांकन : प्रवीण डोके)
फोटोः 05576
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.