राजस्थानी समाज कष्टाळू व प्रामाणिक राजस्थानचे शहर विकासमंत्री झाबर सिंह खर्रा यांचे मत
मार्केट यार्ड : ‘जहाँ न जाए बैलगाडी, वहाँ जाए मारवाडी’ या उक्तीप्रमाणे राजस्थानी समाज हा कष्टाळू व प्रामाणिक असल्याचे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या बांधवांनी आता इथल्या जन्मभूमीशी नाळ घट्ट करावी, असे आवाहन राजस्थानचे शहर विकास मंत्री झाबर सिंह खर्रा यांनी केले.
राजस्थान सरकारच्या आधिपत्याखालील आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत राजस्थान फाउंडेशनच्या पुणे विभागाचा पदग्रहण सोहळा झाबर सिंह खर्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राजस्थान फाउंडेशनच्या पुणे विभागाचे अध्यक्ष मंगलचंद चौधरी, उपाध्यक्ष राजेंद्र बाठिया, सचिव रमेश कासट, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, राजस्थान फाउंडेशनच्या आयुक्त डॉ. मनीषा अरोडा, पुरुषोत्तम लोहिया, वीणा म्युझिकचे संस्थापक रत्न के. सी. मालू, राजेंद्र दाधीच, जय जिनेंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष आचल जैन, ज्येष्ठ विधीतज्ज्ञ एस. के. जैन, उद्योजक राजकुमार चोरडिया उपस्थित होते. पाली येथील खासदार पी. पी. चौधरी यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
झाबर सिंह खर्रा म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीत राजस्थान समाजाचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रात स्थायिक बांधवांसाठी राजस्थान सरकार मदतीचा हात पुढे करीत असून, पुण्यात राजस्थान भवन उभारण्याचा मानस आहे.’’
मुंदडा म्हणाले, ‘‘पुण्यात दहा लाखांहून अधिक राजस्थानी कुटुंबे स्थायिक झाली आहेत. समाजाने सज्जनतेबरोबर सक्रियही होणे आवश्यक आहे. आज १०५० गोशाळा कार्यरत असून, त्यापैकी ८०० राजस्थानी समाज चालवत आहे.’’ डॉ. अरोडा यांनी राजस्थान सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी के. सी. मालू व एस. के. जैन यांनी मनोगत व्यक्त केले. मंगलचंद चौधरी यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी भूमिका स्पष्ट केली. ओम चौधरी व डॉ. रवींद्र मिणीयार यांनी सूत्रसंचालन केले. सचिव रमेश कासट यांनी आभार मानले.
-------
बिबवेवाडी : राजस्थान फाउंडेशनच्या पुणे विभागाच्यावतीने झाबर सिंह खर्रा यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवर.
फोटो ः 05651
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.