मनात स्पष्टता असणाऱ्यांना कोणीही फसवू शकत नाही प्रवीणऋषीजी म. सा. यांचे मत, जैन धर्मीयांचे उत्तरायण सूत्रला प्रारंभ
मार्केट यार्ड, ता. १० ः आयुष्याविषयी, समाजाविषयी, व्यवहार ज्ञानाविषयी ज्याला सत्य माहीत असतं, त्याविषयी त्याच्या मनात स्पष्टता असते, त्याला कोणीही फसवू शकत नाही किंवा कोणी त्याला चुकीच्या मार्गाने घेऊन त्याचा गैरफायदा घेऊ शकत नाही, असे मत प्रवीणऋषीजी म. सा. यांनी व्यक्त केले. जैन धर्मियांच्या उत्तरायण सूत्र सुरू आहे. यावेळी ते बोलत होते.
प्रवीणऋषीजी म्हणाले, ‘‘दुःखाच्या गर्तेत माणूस इतका अडकलेला असतो, की समोरून सुख आलेलं त्याला जाणवतही नाही. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपण पर्याय शोधायला हवेत. समजा आपल्याला ताप आला आणि त्यावर औषध म्हणून आपण फक्त टॉनिक घेत राहिलो तर आपल्या रोगाचा नाश होईल का किंवा त्याचा समूळ नष्ट होईल का ? तर नक्कीच नाही. अगदी तसेच दुःखाचं आहे. त्याचं समूळ नष्ट व्हायला हवे. दुःखाला समाप्त न करता, जे सुखाचा शोध घेण्याचा आटापिटा करतात. त्याची तुलना गटारातील पाण्यावर सुगंधित अत्तर द्रव्य मारण्यासारखीच आहे, अशीच केली जाऊ शकते. वेळ एकदा निघून गेली की परत येत नाही. तसेच रात्रसुद्धा एकदा उलटून गेली की ती परत मागे वळून येत नाही.’’
‘‘अंधार म्हणजे दुःखाची वेदना आहे का किंवा अंधार म्हणजे प्रतिकूलता आहे का तर नक्कीच नाही. अंधार हा प्रमाद आहे, आळस आहे, गैरसमजाचे साम्राज्य आहे. अशा गैरसमजातून देखील एखादी व्यक्ती इच्छित स्थळापर्यंत पोहोचू शकला तर त्याची रात्र उजळच होते.’’ असेही प्रवीणऋषीजी यांनी सांगितले.
फोटो ः 05840
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.