धनादेश वटण्यामधील अडथळ्याने व्यापारी हैराण
मार्केट यार्ड, ता. १२ : भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग प्रणालीतील नियम आणि तांत्रिक प्रक्रिया सुधारण्यासाठी ४ ऑक्टोबर २०२५ पासून नव्या प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व बँकांना त्यांच्या बॅक-एंड तंत्रज्ञानाचे अद्ययावतीकरण (अपग्रेडेशन) करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या तांत्रिक बदलांमुळे चेक क्लिअरिंग प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांचे लाखो, करोडो रुपयांचे व्यवहार अडकले आहेत. परिणामी व्यापारी हैराण झाले आहेत.
यापूर्वी टी+१ प्रणालीनुसार, ग्राहकाने धनादेश जमा केल्यावर दुसऱ्या दिवशीच संबंधित रक्कम खात्यात जमा होत असे. मात्र, सध्या प्रणाली अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमुळे अनेक बँकांमध्ये धनादेश वटण्यासाठी ५ ते ६ दिवसांचा विलंब होत आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार अडकले असून, व्यापाऱ्यांसह सामान्य ग्राहकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही प्रणाली पूर्णपणे सुधारित झाल्यानंतर धनादेश वटणे पुन्हा पूर्ववत सुरळीत होईल. मात्र, सध्या अनेक बँकांकडेही नवीन प्रणाली कधीपर्यंत सुरू होईल, याची पूर्ण माहिती उपलब्ध नसल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
------
‘‘नवीन अमलात आणलेल्या प्रणालीत त्रुटी आहेत. त्यामुळे बँकेत धनादेश भरल्यास पैसे जमा होत नाहीत. त्यामुळे करोडोंचे व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी ऐन दिवाळीत व्यापाऱ्याच्या अडचणीत भर पडली आहे. याबाबत शासनाने तत्काळ मार्ग काढून अडचणी सोडवाव्यात.
- आशिष दुगड, सहसचिव, दि पूना मर्चंटस चेंबर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.