सुकामेवा स्वस्त
मार्केट यार्ड, ता. १६ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुकामेव्याला प्रचंड मागणी असून, यंदा उत्पादनही समाधानकारक झाले आहे. त्यातच जीएसटी कपात झाल्याने बदाम, काजू, अक्रोड, बेदाणे यांसारख्या सुकामेव्याचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी सर्वसामान्य ग्राहकांसाठी अधिक गोड ठरणार आहे. मागणी वाढल्याने बाजारपेठा सजल्या असून शहरातील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत आहे.
बदाम, जर्दाळू, अंजीर, खारीक, पिस्तासह काही वस्तूंवरील जीएसटी कपात झाली आह, तसेच उत्पादनात देखील वाढ झाल्याने दर घटले आहेत. सुकामेव्याचे दर कमी झाल्याचा फायदा दिवाळीत सर्वसामान्यांना होत आहे. सुकामेव्याच्या बॉक्स खरेदीवर लोकांचा भर वाढला आहे. आता कॉर्पोरेट क्षेत्रातही सुकामेव्याचे बॉक्स भेट स्वरूपात देण्याचा कलदेखील वाढला आहे. यंदा परवडणाऱ्या किमतीत ग्राहकांना खरेदीची संधी असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी विनोद गोयल यांनी सांगितले.
दरवर्षी दिवाळीनिमित्त संस्था, संघटना, कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना तसेच मित्र आणि नातेवाईकही एकमेकांना मोठ्या प्रमाणात दिवाळी भेट देत असतात. बाजारात सध्या विविध प्रकारच्या सुट्या आणि पॅकिंग सुकामेव्याला मागणी वाढत आहे. यंदा प्रत्यक्ष दिवाळीला सुरुवात होईपर्यंत मागणी कायम असणार आहे.
येथून झाली आयात
- काजू : गोवा, कर्नाटक, कोकण, केरळ
- बदाम : कॅलिफॉर्निया, ऑस्ट्रेलिया
- मॉमेरोन बदाम : इराण
- मनुके : सांगली
- पिस्ता : इराण, इराक,
- खारा पिस्ता : इराण, अमेरिका, कॅलिफोर्निया
- अक्रोड : अमेरिका, चिली, भारताच्या काही भागातून
- अंजीर : इराण, अफगाणिस्तान
- बेदाणा : अफगाणिस्तान, भारत
सुक्या मेव्यावरील जीएसटी कपात झाल्याने ग्राहकांना फायदा होत आहे. कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिवाळीला भेटवस्तू देण्यासाठी म्हणून सुकामेव्याची मागणी वाढली आहे. विविध आकर्षक बॉक्समध्ये तसेच काचेच्या बरण्यांमध्ये काजू बदाम किसमिस पिस्ता देण्यात येत आहे.
- बी. उदय, कुमू प्रीमीयम ड्रायफ्रूट, कोथरूड
यंदा सर्वत्र पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे सुकामेव्याचे पण चांगले आहे. जीएसटी कपातीमुळे ही सुकामेव्याच्या दरात घट झाली आहे. यंदा मागणी चांगली आहे. दिवाळीत मिठाईपेक्षा सुकामेवा भेट देण्याचा कल वाढला आहे. सुकामेव्यावरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कमी केल्याने सुकामेव्याच्या दरात घट झाली आहे.
- नवीन गोयल, सुकामेवा व्यापारी, मार्केट यार्ड
या सुकामेव्याच्या दरात घट
प्रकार -- ऑगस्ट दर -- ऑक्टोबर दर
जर्दाळू -- ३०० ते ६०० -- ३५० ते ५५०
बदाम -- ८५० ते १००० -- ८०० ते ९५०
अंजीर -- १४०० ते १८०० -- १३०० ते १७००
खारीक -- २५० ते ३०० -- १८० ते २५०
खजूर -- १२० ते २०० -- १०० ते १८०
पिस्ता -- १२०० ते १५०० -- ११०० ते १४००
याचे दर स्थिर
काजू : ८५० ते १२००
बेदाणा : ४०० ते ५००
काळे मनुके : ४०० ते ६००
अक्रोड : १२०० ते १८००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.