मार्केटयार्डातील दुरवस्थेला अडते असोसिएशन जबाबदार
सर्वसाधरण सभेत खुलासा करण्याची काही सदस्यांची पत्राद्वारे मागणी

मार्केटयार्डातील दुरवस्थेला अडते असोसिएशन जबाबदार सर्वसाधरण सभेत खुलासा करण्याची काही सदस्यांची पत्राद्वारे मागणी

Published on

मार्केट यार्ड, ता. ३० ः अडते असोसिएशनच्या मनमानी कारभारामुळे मार्केट यार्डातील व्यवसायाची दुरवस्था झाली. अडत व्यवसाय पूर्णपणे ढासळला असल्याचा आरोप अडते असोसिएशनच्या काही सदस्यांनी केला आहे. याबाबत शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याचा खुलासा करण्यात यावा, असे पत्रही अडते असोसिएशनला दिले आहे.
कांदा बटाटा लसूण विभागातील अडतदार किशोर कुंजीर आणि कंपनी, समीर मोराडे आणि कंपनी, श्रेयश ट्रेडिंग कंपनी, मानाजी तुकाराम थोरात अँड सन्स, दत्तात्रेय थोरात अँड कंपनी, वैष्णवी ट्रेडिंग कंपनी, टेमकर अँड कंपनी, जवळकर अँड कंपनी यांनी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनला पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून वार्षिक सर्वसाधारण सभा घेतलेली नाही. तसेच मुदत संपूनही निवडणुका झालेल्या नाहीत. संस्थेच्या शासकीय कामकाजात मोठ्या प्रमाणावर अनियमितता, अपूर्णता आणि कायद्याचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले आहे. हिशोबही प्रमाणित केलेले नाहीत. त्यामुळे अडत व्यवसाय सुमारे ८० टक्क्यांनी घटला आहे. व्यवसायवृद्धीसाठी गेल्या तीन वर्षांत अडते असोसिएशन पूर्णपणे अपयशी ठरली आहे.
---
‘‘कायदेसंमत अडत व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरीहित सर्वोच्च मानून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वर्तमान व्यवसायात खात्रीशीरपणे किमान ३०० टक्क्यांनी वाढ करता येईल, असा प्रस्ताव फॅक्ट इंडियाने डिसेंबर २०२४ मध्ये सादर केला होता. दुर्दैवाने अडते असोसिएशन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक या प्रस्तावाबाबत सकारात्मक नसल्यामुळे शेतकऱ्यांचे तसेच सर्व अडत्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
- किशोर कुंजीर, अध्यक्ष, फेडरेशन फॉर अ‍ॅग्रो, कॉमर्स अ‍ॅण्ड ट्रेड
---------------------------
सर्व आरोप बिनबुडाचे
काहीजणांनी जाणून-बुजून अडते असोसिएशनची बदनामी करण्यासाठी आरोप केले आहेत. संघटनेने जबाबदारीने काम केले आहे म्हणूनच बाजार समितीचा सेस २२ कोटी रुपयांनी वाढलेला आहे. त्यातून व्यापारही वाढला आहे. गेल्या तीन वर्षात व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच काम केले आहे.
- अनिरुद्ध (बापू) भोसले, अध्यक्ष, अडते असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com