आर. एम. डी. शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

आर. एम. डी. शाळेच्या 
विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
Published on

मार्केट यार्ड, ता. ८ : रसिकलाल एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा १०वी व १२ वीचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
१२वीच्या वाणिज्य शाखेत बीबी आयेशा शेख हिने ८७.६७ टक्के, मंतशा मिसाळ हिने ८४.८३ टक्के, तर धनश्री थिटे हिने ८१.५० टक्के गुण मिळवीत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला आहे. विज्ञान शाखेत श्रद्धा उबाळे हिने ९२.३३ टक्के, संस्कृती भुजबळ हिने ८९ टक्के, तर मुग्धा नरवडे हिने ८४.८३ टक्के गुणांसह अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले आहे.
दहावीच्या परीक्षेत अथर्व नडगिरी याने ९५.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे, दिव्यांग असूनही अथर्वने उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी दिलेल्या अतिरिक्त वेळेची सवलत न घेता हे यश संपादन केले. दहावीत हर्षदा भराटे हिने ९३.८० टक्के गुणांसह द्वितीय, तर कुमारी श्‍वेता गायकवाड हिने ९३.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. विद्यालयातील ११ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन असून, संस्थेचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com