

मार्केट यार्ड, ता. १० : देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून मासळीची आवक होत आहे. मासळीचे तेजीतील भाव कायम आहेत. उन्हाचा चटका वाढल्याने बाजारात कोंबड्यांचा पुरवठा कमी झाला असून चिकनच्या भावात किलोमागे १० रुपयांची वाढ झाली आहे. मात्र पुरवठा अधिक असल्याने इंग्लिश अंड्यांचे भाव शेकड्यामागे १० रुपयांनी कमी झाले. मात्र, गावरान अंडी आणि मटणाचे भाव स्थिर आहेत.
गणेश पेठेतील घाऊक बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची १५ टन, खाडीच्या मासळीची ४०० किलो आणि नदीच्या मासळीची ७०० किलो आवक झाली. आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची १५ टन आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) - पापलेट : कापरी : १८००-२०००, मोठे : १६००-८००, मध्यम : १४००-१५००, लहान : ११००-१२००, भिला : ९००-१०००, हलवा : ८००-१०००, सुरमई : ८००-१२००, रावस : ८००-१०००, घोळ : ८००-१०००, करली : ३५०-४००, करंदी (सोललेली) : ४००-४५०, भिंग : ४००-४५०, पाला : १२००-१४००, वाम : पिवळी : ९००-११००, काळी : ३००-४००, ओले बोंबील : ३५०-४५०. कोळंबी : लहान : २५०-३६०, मध्यम : ३५०-५००, मोठी : ५५०-७५०, जम्बो प्रॉन्स : १५००-१६००, किंग प्रॉन्स : ८००-९००, लॉबस्टर : २०००-२२००, मोरी : ३५०-४००, मांदेली : १२०-१६०, राणीमासा : २५०-३००, खेकडे : ३००-४००, चिंबोऱ्या : ७००-१०००.
खाडीची मासळी : सौंदाळे : २५०-३००, खापी : २५०-३००, नगली : ४५०-५००, तांबोशी : ५५०-६५०, पालू : २५०-३००, लेपा : ३५०-४००, बांगडा : २५०-३००, शेवटे : ३५०-४००, पेडवी : १५०-२००, बेळुंजी : १५०-२००, तिसऱ्या : २५०-३००, खुबे : १५०-२००, तारली : २००-२५०. नदीतील मासळी : रहू : १६०-१८०, कतला : १८०-२४०, मरळ : ३५०-४५०, शिवडा : २००-२५०, खवली : २००-२५०, आम्ळी : १२०-१८०, खेकडे : २५०-४००, चिलापी : ८०-१८०, वाम : ५५०-६००.
मटण : बोकडाचे : ८००, बोलाईचे : ८००, खिमा : ८००, कलेजी : ८४०.
चिकन : २५०, लेगपीस : ३२०, जिवंत कोंबडी : १८०, बोनलेस : ३५०.
अंडी : गावरान (शेकडा) : ११२०, डझन : १४०, प्रतिनग : १२.
इंग्लिश (शेकडा) : ५७०, डझन : ७८, प्रतिनग : ६.५०.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.