

मार्केट यार्ड, ता. २५ : पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (ता. २५) फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर होती. मागणीच्या तुलनेने आवक कमी झाल्याने हिरवी मिरची, फ्लॉवर, कोबीच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेने दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली. तर इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे गेल्या आठवड्यातील भाव स्थिर होते.
परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये बंगळूर येथून आले दोन टेम्पो, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची २० टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा २ ते ३ टेम्पो, इंदूर येथून गाजर ५ ते ६ टेम्पो, आंध्र प्रदेश, हिमाचल मटार एक टेम्पो, तमिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, कर्नाटकातून भुईमूग २ टेम्पो, कर्नाटक येथून पावटा एक टेम्पो, तमिळनाडू येथून तोतापुरी १०० क्रेट, मध्य प्रदेश येथून लसणाचे सुमारे १० ते १२ टेम्पो, इंदूर, आग्रा आणि स्थानिक येथून बटाटा ५० ते ६० टेम्पो आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ४०० ते ४५० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार क्रेट्स, हिरवी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, गाजर ४ ते ५ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, मटार ५० ते ६० गोणी, घेवडा आणि पावटा प्रत्येकी सुमारे २ टेम्पो, कांदा सुमारे १०० ते १२० टेम्पो आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :
कांदा : ३५०-४५०, बटाटा : ८०-२८०, लसूण : ७००-२१००, आले (सातारी) : ५००-६००, भेंडी : २००-४००, गवार : ४००-६००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : २००-३००, हिरवी मिरची : ३५०-४००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : २००-३००, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : १८०-२००, पापडी : ४००, पडवळ : १५०-२००, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : ६०-१००, वांगी : २००-४००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : ३५०-४००, तोंडली : कळी : ३५०-४००, जाड : २००-२२०, शेवगा : ४००-६००, गाजर : ३००-३५०, वालवर : २५०-३००, बीट : १८०-२००, घेवडा : ४००-६००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ६००-८००, मटार : ८००-१२००, पावटा : ८००-१०००, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : १०००-११००, सुरण : १८०-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
रविवारी बाजारात कोथिंबिरीच्या सव्वा लाख, तर मेथीच्या ४० ते ५० हजार जुड्यांची आवक झाली. सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे भाव तेजीत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १०००-२५००, मेथी : २०००-२५००, शेपू : १०००-१५००, कांदापात : ८००-१५००, चाकवत : ५००-१०००, करडई : ५००-१०००, पुदिना : ५००-१०००, अंबाडी : ५००-१०००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५००-१०००, चुका : ५००-१२००, चवळी : ५००-८००, पालक : १०००-१५००.
फुलांची आवक वाढली
कोजागरीच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या आवकेसह मागणीतही वाढ झाली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने दरात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे, अशी माहिती फुल अडतदार सागर भोसले यांनी दिली. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-४०, गुलछडी : ५०-८०, अॅष्टर : गड्डी १०-१६, सुट्टा : ५०-१००, शेवंती : २०-८०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : १०-२०, गुलछडी काडी : ३०-८०, डच गुलाब (२० नग) : ४०-८०, जर्बेरा : ४०-६०, कार्नेशियन : १५०-२००, शेवंती काडी १५०-३५०, लिलियम (१० काड्या) १०००-१२००, ऑर्चिड ४००-८००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १००-१५०, जिप्सोफिला : १५०-२००, लिली बंडल : ५-८, जुई : ३००-४००, चमेली : ३००-४००.
खरबूज, पेरूच्या भावात घट
फळबाजारात खरबूज आणि पेरूच्या भावात घट झाली असून, लिंबाच्या भावात मात्र वाढ झाली आहे, तर डाळींब, कलिंगड, पपई, सीताफळ, ड्रॅगन, संत्रा, मोसंबी, अननस, सफरचंद आणि पिअरचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फळबाजारात रविवारी लिंबू एक हजार ते बाराशे गोणी, मोसंबी ६० ते ७० टन, संत्री २५ ते ३० टन, डाळिंब ७० ते ८० टन, पपई ९ ते १० टेम्पो, कलिंगड ५ ते ६ गाड्या, खरबूज १२ ते १३ टेम्पो, चिक्कू दोन हजार डाग, पेरू अडीच ते तीन हजार क्रेट, पिअर ५ गाड्या, सीताफळ ८ ते १० टन, ड्रॅगन ९ ते १० टन, सफरचंद ६ ते ७ हजार पेटी आणि अननसाची ६ ट्रक इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे :
लिंबे (प्रतिगोणी) : ३०० ते २५००, मोसंबी : (३ डझन) : १४०-३२० (४ डझन) : ५०-१३०, संत्री : (१० किलो) : १५०-८००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ७०-२५०, आरक्ता : ५०-१२०, गणेश : १०-४०, कलिंगड : १२-२०, खरबूज : २०-३५, पपई : १५-३०, चिक्कू (दहा किलो) : १००-६००, पेरू (२० किलो) : ३००-५००, अननस (१ डझन) : ३००-९००, सीताफळ (१ किलो) : २०-१००, पिअर (२४ ते २५ किलो) : ३५००-४०००. ड्रॅगन (एक किलो) ७०-१४०, सफरचंद काश्मीर डेलिशियस (१५ ते १७ किलो) १४००-२२००, किन्नोर (२० ते २५ किलो) ४०००-४५००, शिमला (२० ते २५ किलो ) ३०००-३५००.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.