

शिक्षण प्रसारक मंडळाचा दहावीचा निकाल ९१.७७ टक्के
अकलूज : शिक्षण प्रसारक मंडळाच्या २९ शाखांचा दहावी परीक्षेचा एकूण निकाल ९१.७७ टक्के लागला आहे. मंडळाच्या विविध शाळांमधील २६४८ विद्यार्थ्यांपैकी २४३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिजामाता कन्या प्रशालेच्या सृष्टी दोशी हिने ९१.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. समशंमोपा विद्यालय, वेळापूर येथील संस्कृती कोरेकर हिने द्वितीय, तर महर्षी प्रशाला, यशवंतनगर येथील समृद्धी बाबर हिने तृतीय क्रमांक मिळविला. मंडळाच्या शिवथर येथील श्री समर्थ रामदास स्वामी विद्यामंदिरचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तसेच जिजामाता कन्या प्रशालेच्या सृष्टी दोशी व मुस्कान सय्यद यांनी संस्कृत विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळविले. शाखानिहाय निकालात जिजामाता कन्या प्रशाला (९८.८७), श्रीमती रमोपा विद्यालय, कोथरूड (९८.३६), श्री विमोपा विद्यालय, विजयनगर (९७.३७), श्री विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालय, वाघोली (९७.३७) यांनी उल्लेखनीय यश मिळविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.