उद्या मुख्यमंत्र्याचा भोसरीत रोड शो, तर चिंचवडमध्ये सभा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

पिंपरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज दौरा जाहीर झाला आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्यातच पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री उद्या(गुरवारी) येणार असून ठाकरे एक दिवसाच्या अंतराने म्हणजेच शुक्रवारी येणार आहेत.ठाकरे यांची फक्त सभा त्यांच्या उमेदवाराच्या मतदारसंघात (पिंपरी) होत आहे पण मुख्यमंत्री हे आपल्या एका उमेदवारासाठी भोसरीत रोड शो करणार आहेत तर दुसऱ्याकरिता चिंचवडला सभा घेणार आहेत

महायुतीच्या शहरातील प्रचाराचा नारळ ठाकरे हे शुक्रवारी (ता.११) शिवसेनेचे उमेदवार अॅड गौतम चाबूकस्वार यांच्यासाठी सभा घेऊन फोडणार आहेत तर, मुख्यमंत्री हे गुरुवारी (ता.१०) भाजपचे भोसरीतील उमेदवार महेश लांडगे (भोसरी) यांच्यासाठी ते मतदारसंघात सायंकाळी पाच वाजता रोड शो करणार आहेत. नंतर ते लक्ष्मण जगताप (चिंचवड) यांच्याकरिता त्यांच्या मतदारसंघात सहा वाजता सभा घेणार आहेत.

दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या टप्यातही मुख्यमंत्री शहरात येणार आहेत. त्यावेळी ते चिंचवडला रोड शो करून भोसरीत सभा घेणार आहेत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tomorrow the Chief Minister devendra fadnavis Road show at Bhosari for Mahesh landge and Rally at Chinchwad for laxman Jagtap