
पुणे : ‘टिपू पठाण टोळी’तील खंडणी, खुनाचा प्रयत्न, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यांतील वॉन्टेड सराईत गुन्हेगार शाहरुख ऊर्फ अट॒टी शेख हा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळजवळ लांबोटी गावात पुणे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. दरम्यान, ‘टिपू टोळी’वर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मकोका) कायद्यान्वये काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, टोळीप्रमुख रिझवान ऊर्फ टिपू पठाणसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.