मुहुर्त : पुणे ते तोरणा गडाच्या पायथ्याशी PMPML ची सेवा सुरू

तोरणा गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर छत्रपती शिवरायांचा जयघोष करत फटाक्यांची आतिषबाजी करून नागरिकांनी मोठ्या जल्लोषात बसचे स्वागत केले.
PMPML
PMPMLSakal

वेल्हे, (पुणे) : गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या पुणे (कात्रज) ते तोरणागड पायथा वेल्हे पीएमपीएमएल सेवा आज (ता. २४ )रोजी अखेर सुरू झाली. यासाठी वेल्हे तालुक्यातील सर्व पक्षीय राजकीय पदाधिकारी यांनी प्रयत्न केले होते. तोरणा गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर छत्रपती शिवरायांचा जयघोष करत फटाक्यांची आतिषबाजी करून नागरिकांनी मोठ्या जल्लोषात बसचे स्वागत केले. (Pune To Torna Fort PMPML Bus Service Start)

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, पीएमपीएल वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांच्या उपस्थितीत दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहजवळ या बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी वेल्हे तालुका काँग्रेसचे युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर, उपाध्यक्ष गणेश जागडे, निलेश पवार, अमोल पडवळ, प्रदीप मरळ, शंकर चाळेकर आदी उपस्थित होते.

किल्ले तोरण्याच्या पायथ्याशी साडे तीनच्या दरम्यान बस आल्यानंतर नागरिकांनी छत्रपती शिवरायांचा जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी करत पीएमपीएलच्या वाहक ,चालक व अधिकाऱ्यांचा सन्मान पंचायत समिती वेल्हे, ग्रामस्थ, प्रशासकीय अधिकारी व मेंगाई देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आला. यावेळी वेल्ह्याचे सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, तहसीलदार शिवाजी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार ,वेल्हे कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना राऊत, मेंगाई देवस्थान ट्रस्टचे प्रकाश पवार, सचिव विलास पांगारे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, माजी सरपंच संतोष मोरे,तानाजी मांगडे, डॉ.जितेंद्र जाधव, विशाल वालगुडे, सुनिल कोळपे,राजु रेणुसे, अक्षय राऊत, रोहिदास शेंडकर, सुनील राजिवडे ,आदींसह नागरिक उपस्थित होते.

जिल्हा परिषद सदस्य दिनकराव धरपाळे म्हणाले, या बस सेवेमुळे पर्यटन ,व्यवसाय ,रोजगार निर्मितीसाठी चालना मिळणार असून तालुक्यातील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना राऊत म्हणाले, कोरोनामुळे पुणे शहरात स्थित वेल्हे तालुक्यातील अनेेक नागरिकांचे रोजगार गेले होते त्यामुळे अनेक जण शहर सोडून गावाकडे आले होते परंतु या बस सेवेमुळे गावीच राहून पुणे प्रवास ये-जा करता येणार असून अनेकांचे संसार पुन्हा उभे राहतील.

पीएमपीएल चे डेपो मॅनेजर शैलेंद्र जगताप म्हणाले ,वेल्ह्यातुन दर एक तासाला तोरणा किल्ल्याच्या पायथ्यापासून बस असणार आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटे पर्यंत पुणे शहराकडे जाण्यासाठी बस उपलब्ध असणार आहे

बससेवेची काही वैशिष्ट्ये

१) वेल्हे ते कात्रज तिकीट दर प्रत्येकी ६० रुपये

२) दिवसभरासाठी चा पास ७० रुपयांमध्ये

३)नागरिकांसाठी मासिक पास १४०० रुपये

४) ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पास ५०० रुपये

५)विद्यार्थ्यांसाठी चा मासिक पास ७५० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com