esakal | पुण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; शहरात ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट

बोलून बातमी शोधा

rain in pune

पुण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; शहरात ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट

sakal_logo
By
शरयू काकडे

पुणे : पुण्यात शुक्रवारी दुपारी ५च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावासाने हजेरी लावली. पावसाचा जोर इतका जास्त आहे की समोरचे काही दिसेनासे झाले आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाटासह शहरातील विविध भागात पावासाने हजेरी लावली. सिंहगड रस्ता, आंबेगाव, दत्तनगर वडगाव बुद्रुक, धायरी कोथरूड सातारा रस्ता, सहकारनगर, रामटेकडी पद्मावती, धनकवडी, आंबेगाव पठार घोरपडी कात्रज या परिसारात मुसळधार पाऊस सुरू आहे.

img

सिंहगड रस्ता परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे

img

आंबेगाव, दत्तनगर परिसरात गारांसह जोरदार पाऊस पडतो आहे.

  • कोथरूड परिसरात पावसाने जोर धरला असून विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली आहे.जोराचा वारा देखील वाहत आहे.

  • आंबेगाव, दत्तनगर परिसरात गारांसह जोरदार पाऊस पडतो आहे.

  • वडगाव बुद्रुक, धायरी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात.

img

कोथरूड परिसरात पावसाने जोर धरला असून विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात

img

रामटेकडी भागात जोरदार वाऱ्यासह पावसाचा जोर

  • सातारा रस्ता, सहकारनगर, पद्मावती, धनकवडी, आंबेगाव पठार या भागात मुसळधार पाऊस सुरू

  • घोरपडी परिसरात जोरदार वारे आणि पावसाला सुरुवात

  • वडगाव धायरी नऱ्हे भागात सोसाट्याच्या वाऱ्या सह पावसाचा जोर

img

किरकटवाडी ,खडकवासला, नांदोशी-सणसनगर परिसरात जोरदार गारपीट सुरू आहे.