esakal | Pune : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार

Pune : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी : दहावीत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील नांदेड येथे घडली आहे. धक्कादायक म्हणजे गर्भवती राहिलेल्या पिडीत अल्पवयीन मुलीची घरीच प्रसुती झाली आहे. संबंधित मुलीच्या फिर्यादीवरून हवेली पोलीस ठाण्यात आरोपी अनिल चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे.

पिडीत मुलगी लहान असतानाच तिच्या वडीलांचे निधन झालेले आहे, त्यामुळे आई व दोन भावांसह ती नांदेड येथे भाड्याच्या घरात राहत आहे. आई एकटी कमवती असल्याने व लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने आईला हातभार म्हणून मुलगी एका कंपनीत काम करत होती. तेथे तिची अनिल चव्हाण या तरुणाशी ओळख झाली. अनिल चव्हाण याने पिडीत मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले व याबाबत कोणाला सांगू नको अशी धमकी दिली. काही महिन्यांपूर्वी पोटात दुखू लागल्याने मुलीने कामावर जाणे बंद केले. मुलीच्या शरीरात झालेले बदल पाहून आईने मुलीला विचारणा केली परंतु तिने आईला काहीही सांगितले नाही.

दोन दिवसांपूर्वी पिडीत अल्पवयीन मुलीची घरीच प्रसुती झाली.मोठा रक्तस्राव झाल्याने आईने रिक्षाने तात्काळ मुलीला ससून रुग्णालयात उपचारांसाठी नेले. त्यावेळी बाळ मृत असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी अनिल चव्हाण (पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात बलात्कार व पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाला असून पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते याबाबत अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे

loading image
go to top