खडकवासला प्रकल्पात 91 टक्के पाणी; उजनीतील साठा 54 टक्‍क्‍यांवर  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

khadakwasla-dam

भाटघर, वडज,खडकवासला,गुंजवणी आणि वीर ही धरणे जवळपास भरली आहेत.  पानशेत धरण सोमवारी रात्री पूर्ण भरल्याने त्यातून दोन हजार 407 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे.त्यामुळे खडकवासला धरणात पाण्याचा येवा वाढला आहे.

खडकवासला प्रकल्पात 91 टक्के पाणी; उजनीतील साठा 54 टक्‍क्‍यांवर 

पुणे - खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मंगळवारी सायंकाळपर्यंत एकूण पाणीसाठा 26.35 टीएमसी (90.41 टक्के) झाला आहे. पानशेत धरण सोमवारी रात्री पूर्ण भरल्याने त्यातून दोन हजार 407 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणात पाण्याचा येवा वाढला आहे. सध्या मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग नऊ हजार 361 क्‍युसेकने सुरू आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली. 

जिल्ह्यात सध्या पानशेत, कळमोडी, नाझरे आणि आंद्रा ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. भाटघर, वडज, कासारसाई, खडकवासला, गुंजवणी आणि वीर ही धरणे जवळपास भरली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत एकूण 26.35 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी 29.15 टीएमसी (शंभर टक्के) पाणीसाठा होता. आज दिवसभरात टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 15 मिलिमीटर, वरसगाव 7, पानशेत 7 आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 3 मिलिमीटर पाऊस झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्केवारी) 
टेमघर 2.63 (70.85) 
वरसगाव 11.21 (87.43) 
पानशेत 10.65 (100) 
खडकवासला 1.87 (94.79) 

इतर धरणांतील पाणीसाठा 
भामा-आसखेड 5.65 (73.68) 
पवना 6.35 (74.65) 
मुळशी 17.96 (97.28) 
भाटघर 22.64 (96.32) 
नीरा देवधर 10.10 (86.14) 
वीर 8.87 (94.28) 
डिंभे 9.45 (75.69) 
कळमोडी 1.51 (100) 
आंद्रा 2.92 (100) 
उजनी 29.33 (54.75) 

Web Title: Total Water Storage Four Dams Khadakwasla Project 9041 Percent

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top