Vidhan Sabha 2019 : पर्वती कोणाची वहिनींची की ताईंची ? 

Tough fight between Madhuri Misal and Ashwini Kadam in Parvati Constituency for Maharashtra Vidhan Sabha elections
Tough fight between Madhuri Misal and Ashwini Kadam in Parvati Constituency for Maharashtra Vidhan Sabha elections
Updated on

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांची उमेदवारी बुधवारी रात्री जाहीर झाली. त्यांच्यासमोर आव्हान असेल ते विद्यमान आमदार आणि भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांचे.  

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पर्वती विधानसभा मतदारसंघात अलीकडच्या काही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने बस्तान बसविले आहे. मिसाळ यांची आमदारकीची तिसरी टर्म आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही या मतदारसंघातून उमेदवार दिला होता.  काँग्रेस- राष्ट्रवादीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ कोणाकडे जाणार, या बद्दल उत्सुकता होती. त्यात राष्ट्रवादीने बाजी मारली. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढविण्याचे या पूर्वी सहावेळा निवडून आलेले काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांचे स्वप्न हवेत विरले आहे.  
 शहरातील एक महत्त्वाचा मतदारसंघ, अशी ओळख असलेल्या पर्वतीमध्ये सुमारे तीन लाख 53 हजार मतदार आहेत. सोसायटी आणि वस्ती भागातल्या मतदारांची संख्या येथे मोठी आहे. मराठा, माळी, दलित मतदारांबरोबरच जैन मतदारांचीही संख्या येथे मोठी आहे.

मिसाळ यांना यंदा उमेदवारीसाठी महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले तसेच नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, गोपाळ चिंतल यांच्याशी स्पर्धा करावी लागली तर कदम यांना  संतोष नांगरे, अर्चना हनमघर यांच्याशी स्पर्धा करावी लागली. 

 26 सप्टेंबर रोजी झालेल्या प्रचंड पावसामुळे अरण्येश्वर, तावरे कॉलनी, शिवदर्शन, पर्वती पायथा आदी ठिकाणी नागरिकांना फटका बसला. अरण्यश्वेरच्या टांगेवाला कॉलनीमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. तर ट्रेझर पार्क, केके मार्केट या मोठ्या सोसायट्यांनाही पावसामुळे साठलेल्या पावसाचा फटका बसून त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे अंबिल ओढयातील अतिक्रमण, त्यातील कचरा हा मुद्दा ऐरणीवर आला असून त्याचं प्रतिबिंब मतदानात येईल, अशी चिन्हे आहेत.  

मिसाळ शहराध्यक्ष असल्यामुळे त्यांना अन्य मतदारसंघाकडे ही लक्ष द्यावे लागणार असले तरी त्याची तयारी करून त्यांनी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविल्या पासूनच अश्विनी कदम या विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यांचे पती नितीन कदम हे पूर्वीपासूनच सक्रिय आहेत. मतदारसंघात त्यांची पहिली फेरीदेखील पूर्ण झालेली आहे. 

पर्वतीमध्ये पहिल्यांदाच दोन प्रमुख महिला उमेदवारांमध्ये आमदारकीसाठी   लढत होत आहे. अन्य घटक पक्षांचे उमेदवार येथे असले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मतदारसंघातून अद्याप उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे मिसाळ आणि कदम यांच्यात चुरशीची लढत होईल, अशी चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com