ताम्हिणी घाट जंगलात पर्यटकांना प्रतिबंध

मकरंद ढमाले
शनिवार, 30 जून 2018

माले - पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला ताम्हिणी घाट व अंधारबन हा परिसर अधिसूचित अभयारण्यांच्या हद्दीत येत असल्याने पर्यटकांना येथील जंगलांमध्ये जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. पर्यटकांना जंगलांत ट्रेकिंग, वॉकिंग व सफर करण्यासाठी लेखी परवानगी घ्यावी लागणार आहे. ताम्हिणी परिसर अभयारण्य घोषित झाल्यापासूनच प्रतिबंध लागू झाला होता; परंतु प्रदूषण, पर्यटकांची वाढती संख्या, दुर्घटना टाळण्यासाठी अंमलबजावणी काटेकोरपणे राबविण्याची वनविभागाची भूमिका आहे. त्यासाठी सुरवातीला प्रबोधन करण्यात येणार असून, त्यानंतर कारवाई करणार आहे; सशुल्क मर्यादित प्रवेशाचे धोरण आखण्याचाही विचार आहे.

ताम्हिणी घाट परिसर ताम्हिणी अभयारण्य, तर अंधारबनाचा परिसर सुधागड अभयारण्याच्या अधिसूचित हद्दीत येतो. या जंगलांमध्ये भरपूर जैव विविधता आहे. या संपदेच्या जपणुकीसाठी हा परिसर ‘इको सेंसेटीव्ह झोन’ घोषित करण्यात आला आहे. ताम्हिणी घाट जंगल, अंधारबन यांत प्रवेश करण्यासाठी पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक यांची पूर्व लेखी परवानगी घ्यावी लागणार आहे. 

हे टाळा 
 विनापरवानगी जंगलात जाणे. 
 सोबत प्लॅस्टिकच्या पिशव्या व वस्तू आणि अग्निजन्य पदार्थ बाळगणे. 
 जंगलांत मुक्‍काम करणे. 
 गोंधळ व गोंगाट करणे.

Web Title: Tourist ban in the forest of Tamhini Ghat