डोंगरवाडी येथील धबधब्‍यात
बुडून पर्यटकाचा मृत्यू

डोंगरवाडी येथील धबधब्‍यात बुडून पर्यटकाचा मृत्यू

माले, ता. ५ ः मुळशी धरण भागातील ताम्हिणी घाटातील डोंगरवाडी (ता.मुळशी) येथील दरीच्‍या खालील बाजूस असणाऱ्या मिल्‍कीबार धबधब्‍याच्‍या पाण्‍यात बुडून युवकाचा बुडून मृत्‍यू झाला. रविवार (ता.२) दुपारी पावणेबारा‍च्‍या सुमारास ही दुदैवी घटना घडली.
समीर आलम (वय२३, रा. कोंढवा, पुणे) असे या दुर्घटनेत मृत्‍युमुखी पडलेल्‍या युवकाचे नाव आहे. याबाबत साहिल पीर मोहमद खान (वय-२३, रा. कोंढवा, पुणे) यांनी पोलिसांत माहिती दिली.
रविवारी (ता.२) समीर व त्‍याचे सात मित्र फिरण्‍यासाठी कोंढवा व पुणे येथून मुळशीतील ताम्हिणी घाट परिसरातील
मिल्‍कीबार धबधब्‍याच्‍या परिसरात आले होते. दुपारी पावणेबारा वाजण्‍याच्‍या सुमारास समीर धबधब्‍याच्‍या पाण्‍यात गेला. पाय घसरून तो पाण्‍यात बुडू लागला. समीरला पोहता येत नव्‍हते. त्‍यामुळे तो बुडाला. त्‍याच्‍याबरोबर कोणत्‍याही मित्रांना पोहता येत नसल्‍याने त्‍यांनी मानवी साखळी करून समीरला बाहेर काढले. त्‍याला सीपीआर दिला. परंतु, तोपर्यंत त्‍याचा मृत्यू झाला होता.
पौड पोलिस पुढील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com