
किल्ले राजगड (ता.राजगड)येथे पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा डोक्यात दगड पडून मृत्यू झाल्याची झाल्याची घटना रविवार (ता.२६ )प्रजासत्ताक दिनी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.अनिल विठ्ठल आवटे (वय.१८)सध्या राहणार धायरी, पुणे मूळ गाव खादगाव, भाबट (ता.सेलू) जिल्हा ,परभणी असे असून गडावरून वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात येण्यास रात्री उशीर झाला. रुग्णालयाचे डॉ.ज्ञानेश्वर हिरास यांनी अनिल यास मृत घोषित केले. दरम्यान रात्री उशिरा बारा वाजल्यानंतर वेल्हे पोलीस ठाण्यात खबर दाखल झाली.