
वेल्हे : किल्ले तोरणा (ता. राजगड) या ठिकाणी येथे ट्रेकिंग साठी आलेल्या एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार (ता.०७) रोजी रात्री उशिरा घडली असून रणजीत मोहनदास शिंदे (वय. 44) मूळ गाव सोनगाव, ता.जिल्हा, सातारा सध्या राहणार वारजे, पुणे असे नाव असून फजीलत खान हिने पोलिस ठाण्यात खबर दिली असून याप्रकरणी रविवार (ता.८) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वेल्हे पोलीस ठाण्यात खबर दाखल करण्यात आली. असून ठाण्याचे ज्ञानेश्वर धिवार याबाबत अधिक तपास करत आहेत.