Rajgad News : राजगडावर दरीत कोसळलेल्या पर्यटकास जीवदान

किल्ले राजगडावर पर्यटनासाठी गेलेला तरुण बालेकिल्ल्याच्या रहदारीचा रस्ता सोडून चुकीच्या रस्त्याने गेल्याने खोल घसरत सुमारे 40 ते 50 फूट दरीत पडून जखमी झाला.
Avinash Bagul

Avinash Bagul

sakal

Updated on

वेल्हे, (पुणे) - किल्ले राजगडावर (ता. राजगड) पर्यटनासाठी गेलेला तरुण बालेकिल्ल्याच्या रहदारीचा रस्ता सोडून चुकीच्या रस्त्याने गेल्याने खोल घसरत सुमारे 40 ते 50 फूट दरीत पडून जखमी झाला होता. त्यास वाचवण्यास आपत्ती व्यवस्थापन टीमला यश मिळाले असल्याची माहिती रेस्क्यू टीमचे सदस्य तानाजी भोसले यांनी दिली. अविनाश श्रावण बागुल (वय-25) मुळगाव जळगाव, जिल्हा जळगाव, सध्या राहणार रांजणगाव, एमआयडीसी पुणे. असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com