जुन्नर - सह्याद्रीच्या रांगेतील ऐतिहासिक दाऱ्याघाटाचे सौंदर्य पर्यटकांच्या गर्दीने फुलले आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या परिसरात पावसाळ्यात वर्षा सहलीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे..दर आठवड्यात शनिवार व रविवार, तसेच सुट्टीच्या दिवशी १० हजाराहून अधिक पर्यटक येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी, तसेच आकर्षक अशा सांडदरा धबधब्याला भेट देण्यासाठी येत असतात. जुन्नर तालुक्यातील अंबोली हे पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे, तर ठाणे व पुणे यांच्या मध्यभागी ढाकोबा पर्वतरांग, तसेच येथे मीना नदीचे उगमस्थान आहे..येथील दाऱ्याघाट सांडदरा धबधबा हा निसर्गातून येणाऱ्या नितळ स्वच्छ पाण्याचा झरा असून, अतिशय सुंदर मनमोहक आहे. तसेच सुरक्षित देखील आहे. यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच धबधब्याचा व वर्षाविहाराचा आनंद घेता येतो. येथे दिवसभरात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत असतात. येथील घनदाट जंगल, खळखळत वाहणारी मीना नदी, नैसर्गिक पाऊलवाटा पर्यटकांना पुन्हा- पुन्हा येण्यास भाग पाडतात..पर्यटकांना स्थानिक पातळीवर थोड्या फार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. भविष्यात स्थानिक नागरिकांना रोजगार निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक प्रशासनाच्या वतीने पर्यटकांनी आदिवासी बांधवांचे व निसर्गाचे जल जमीन, तसेच जंगल यांना बाधा निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्यावे, कचरा करू नये, ग्रामपंचायतीने केलेल्या शोषखड्ड्यात कचरा टाकावा, धबधब्याचे पावित्र्य राखावे, स्थानिक प्रशासनाचे नियम पाळावेत, आपली वाहने योग्य ठिकाणी लावावीत, कोणत्याही प्रकारचे मद्यपान करू नये, असे आवाहन स्थानिकांनी केले आहे..येथील पर्यटन विकासासाठी प्रशासनाने सुनियोजित आराखडा तयार करणे महत्त्वाचे आहे. पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवणे, तसेच घनकचरा व्यवस्थापन नियोजन करणे गरजेचे आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना व सोयी-सुविधा निर्माण करणे अतिशय महत्त्वाचे आहे.- नामाबाई मोहरे, माजी सरपंच, अंबोली.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.