esakal | पर्यटकांचा मोर्चा पुन्हा लोणावळ्याकडे
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटकांचा मोर्चा पुन्हा लोणावळ्याकडे

पर्यटकांचा मोर्चा पुन्हा लोणावळ्याकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणावळा : परिसरात सध्या पावसाने उघडीप दिली आहे. पूर परिस्थिती आता ओसरू लागली आहे. कोरोनामुळे येथील पर्यटन स्थळांवर १४४ कलम लागू आहे, असे असतानाही काही हौशी पर्यटक पुन्हा लोणावळ्यात गर्दी करत आहे.(Tourists crowd at Lonavla Bhushi Dam)

लोणावळ्यातील सहारा पुलाजवळील धबधबा, खंडाळा, बोरघाटात वर्षाविहारासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यामुळे येथे १४४ कलम लागू होत नाही का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे, तर दुसरीकडे भुशी धरण, लायन्स पॉइंट, तुंगार्ली धरण परिसरात पर्यटक बंदी असल्याने व्यावसायिकांची उपासमार होत आहे. त्यामुळे ही पर्यटनस्थळे खुली करावी, अशी मागणी होत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असताना लोणावळा, खंडाळा, कार्ला, लोहगड, पवना परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत होती. सार्वजनिक ठिकाणी, पर्यटनस्थळी पर्यटकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचे चित्र होते. पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेत पर्यटनस्थळांवर खबरदारी घेण्याच्या सूचना केली होती. पर्यटकांची वाढती संख्या पाहून पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर १४४ कलम लागू केले. भुशी धरण, लायन्स पॉइंट, कार्ला, पवना परिसरात पर्यटकांना मनाई करण्यात येत माघारी फिरविण्यात आले. पोलिसांतर्फे अनेकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली.

हेही वाचा: खासगी शाळेचे 25 टक्के शुल्क कपात, पुणे जिल्हा परिषदेत ठराव मंजूर

दरम्यान, सध्या पावसाचा जोर कमी होत आहे. त्यामुळे पर्यटक पुन्हा येत असून, धबधबा दिसेल त्या ठिकाणी थांबून मजा लुटत आहेत. मात्र, पर्यटन बंदीचा फटका छोट्या व्यावसायिकांना बसत आहे. रस्त्यावरील चिक्की विक्रेते, मक्याचे भुट्टेवाले, वडापाव विक्रेते, टपरीधारक तसेच, टुरिस्ट व्यावसायिकांची उपासमार होत आहे. लोणावळा, खंडाळ्यात इतर ठिकाणी गर्दी होत असताना, त्या ठिकाणी १४४ कलम लागू होत नाही का? भुशी धरण, लायन्स पॉइंट बंद का? असा सवाल स्थानिक व्यावसायिक साहेबराव चव्हाण यांनी उपस्थित केला.

loading image
go to top