Garbage Fire : लोणी काळभोर मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याची आग आजही कायम; परिसरात विषारी धुराचे मोठे लोट, श्वसनाचा त्रास झाल्याने विद्यार्थी रुग्णालयात

उरुळी कांचन येथील मुळा-मुठा नदीच्या पात्रात अवैधरित्या टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना आली समोर.
loni kalbhor mula mutha Riverbed Garbage Fire

loni kalbhor mula mutha Riverbed Garbage Fire

sakal

Updated on

- सुनील जगताप

उरुळी कांचन - येथील मुळा-मुठा नदीच्या पात्रात अवैधरित्या टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या आगीमुळे परिसरात प्रचंड विषारी धुराचे लोट पसरले असून श्वास घेण्यास त्रास झाल्याने एमआयटी शिक्षण संकुलातील काही विद्यार्थ्यांना शुक्रवारी मध्यरात्री जवळच्या रुग्णालयात भरती करावे लागले.एमआयटी शिक्षण संकुलातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न शनिवारी देखील सुरू होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com