अंत्रोळीत शेताच्या बांधावरून वाद; ट्रॅक्टरच्या दोरीने दोघांचे गळे आवळून खुनाचा प्रयत्न!

अंत्रोळीत शेताच्या बांधावरून वाद;  ट्रॅक्टरच्या दोरीने दोघांचे गळे आवळून खुनाचा प्रयत्न!
Published on

दोघांचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न

अंत्रोळीत शेताच्या बांधावरून वाद; मंद्रुप पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा

दक्षिण सोलापूर, ता. २१ : अंत्रोळी येथे शेताच्या बांधावर ट्रॅक्टरने नांगर मारण्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोघांचा ट्रॅक्टरमधील दोरीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंद्रुप पोलिस ठाण्यात एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत श्रावणी मारुती थोरात (वय १६ वर्षे ९ महिने, रा. अंत्रोळी) हिने फिर्याद दिली आहे. आरोपी नेताजी शिवाजी थोरात, तानाजी थोरात, महानंदा शिवाजी थोरात व वर्षा नेताजी थोरात हे शेताच्या बांधाजवळ नांगर मारत होते. त्यांना विरोध करण्यासाठी गेलेल्या फुलाबाई थोरात व कार्तिक थोरात यांना आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तानाजी याने काठीने फुलाबाई यांना मारहाण केली. कार्तिकला वाचवण्यासाठी श्रावणी मध्ये पडली असता, तानाजी याने दोरीने कार्तिकचा गळा आवळला. त्यानंतर श्रावणीच्या गळ्यात दोरी अडकवून ‘तुला पण खल्लास करतो,’ अशी धमकी देत तिला शेतात फरफटत नेले. या झटापटीत तिचे कपडे फाडण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपी फरार असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक करंडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com