जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणा : ट्रॅक्टर दुर्दैवी मृत्यू
जेसीबीच्या धक्क्याने
ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू
मालवंडी शिवारातील दुर्घटना; गुन्हा नोंद
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. ३ : मालवंडी (ता. बार्शी) येथील शिवारात माती भरण्याचे काम सुरू असताना जेसीबीच्या धक्क्याने २५ वर्षीय ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली; मात्र या प्रकरणी जेसीबी चालकाविरुद्ध बार्शी तालुका पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश जनार्दन थोरात यांच्या शेतातील नाल्यातील माती काढून शेतात टाकण्याचे काम मागील दोन दिवसांपासून सुरू होते. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ८ वाजता सूरज रेवणनाथ खंडागळे (वय २५, रा. मालवंडी) हा दत्तात्रय रावसाहेब पाटील यांचा ट्रॅक्टर (एमएच १३ बीआर ४४२४) घेऊन माती वाहतुकीसाठी शेतात गेला होता. माती भरण्यासाठी सूरजने ट्रॅक्टर जेसीबीजवळ उभा केला. वाऱ्यामुळे उडणारी माती अंगावर येऊ नये म्हणून तो ट्रॅक्टरमधून खाली उतरून ट्रॉलीच्या मागे उभा राहिला. त्यावेळी जेसीबी चालक उमेश राजगुरू याने माती भरत असताना निष्काळजीपणे जेसीबीचे बकेट ट्रॉलीवर जोरात आदळले. या धक्क्यामुळे ट्रॅक्टर अचानक पाठीमागे सरकला आणि मागे उभा असलेल्या सूरजला धक्का बसून तो खाली पडला. त्यानंतर ट्रॉलीचे मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर नातेवाइकांनी सूरजला बार्शी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मृताचे मेव्हणे विकास पाडुळे यांच्या फिर्यादीवरून जेसीबी चालक उमेश राजगुरू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

