esakal | ...अखेर व्यापाऱ्यांनीच या ठिकाणी जनता कर्फ्यू स्विकारला
sakal

बोलून बातमी शोधा

...अखेर व्यापाऱ्यांनीच या ठिकाणी जनता कर्फ्यू स्विकारला

सासवड येथे होऊ घातलेला लाॅकडाऊन किंवा जनता कर्फ्यू सासवड शहरातील व्यापाऱयांनी खुबीने पाच दिवसांपूर्वीच परतवून लावला होता. मात्र, सामान्य नागरीकांसह व्यापारी व व्यावसायिकांची वाढती कोरोना पाॅझिटिव्ह संख्या व अनेकांच्या बळींचा आकडा पाहता आज व्यापारांनी नगरपालिकेत येत 'जनता कर्फ्यू' जाहीर केला.

...अखेर व्यापाऱ्यांनीच या ठिकाणी जनता कर्फ्यू स्विकारला

sakal_logo
By
श्रीकृष्ण नेवसे

सासवड - येथे होऊ घातलेला लाॅकडाऊन किंवा जनता कर्फ्यू सासवड शहरातील व्यापाऱयांनी खुबीने पाच दिवसांपूर्वीच परतवून लावला होता. मात्र, सामान्य नागरीकांसह व्यापारी व व्यावसायिकांची वाढती कोरोना पाॅझिटिव्ह संख्या व अनेकांच्या बळींचा आकडा पाहता आज व्यापारांनी नगरपालिकेत येत 'जनता कर्फ्यू' जाहीर केला. बुधवार ता. 16 ते मंगळवार ता. 22 या दरम्यान हा अगदी कडक लाॅकडाऊन असेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमदार संजय जगताप, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, पालिका मुख्याधिकारी विनोद जळक, नगरसेवक व विविध व्यापारी - व्यावसायीक, नागरीक आज ता. 12 रोजी दुपारी झालेल्या पालिकेतील बैठकीस उपस्थित होते. अनेकांनी सासवड शहर बंद ठेवावे वा कसे, याबाबत मत मांडले. कोरोना संसर्गाच्या वाढीबाबत व पुढे उपचारार्थ बेड मिळविताना किती दमछाक होते., याबाबत आमदार जगताप यांनी विस्तृत विवेचन केले. त्यातून व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी सर्व व्यापाऱयांच्या वतीने.. सासवड शहरात आम्ही स्वतःहून आठवड्याचा जनता कर्फ्यू पाळणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मुख्याधिकारी जळक यांनी जनता कर्फ्यू पाळण्याच्या निर्णयाचे स्वागत करीत., पालिका यंत्रणा सर्व प्रकारचे सहकार्य करेल. असे स्पष्ट केले. जाणकारांच्या मते 14 दिवस बंद केला तरच संसर्गाची साखळी तोडण्यास बरी मदत होईल.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : शैक्षणिक शुल्क होणार कमी? समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष

फक्त दवाखाने, मेडीकलला सवलत, किराण दुकानेही बंद
दरवेळी सासवड शहरात लाॅकडाऊन काळात किराणा दुकानांना सवलत दिली जात होती. यावेळी जनता कर्फ्यूमध्ये फक्त रुग्णालये, दवाखाने, मेडीकल स्टोअर्स व सकाळी सहा ते नऊ व सायंकाळी सहा ते नऊ असा दुध केंद्रांनाच सवलत दिली आहे. बाकी सर्व बंद राहील. कोरोना संसर्गाची वाढती साखळी तोडायचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

सासवडला एकसाथ घरटी तपासणी 27 रोजी
`सासवड शहरात रविवार ता. 27 रोजी टिमनिहाय दोनजण, अशा सुमारे 500 टिम लावून एका दिवसात प्रत्येक घरी पोचून तपासणी होणार आहे. त्यात सर्व कुटुंबांनी त्या दिवशी घरीच थांबावे. सासवड सिल केले जाईल. प्रत्येक कुटुंबांतील सदस्यांची विहीत फाॅर्ममध्ये माहिती भरुन ऑक्सीजन लेवल, थर्मल स्कॅनर तपासणी टिमतर्फे होईल. तपासणीत जे संशयित वाटतील., त्यांचे तिथेच स्वॅब घेऊन त्यांची रॅपिड अँटीजजेन टेस्च केली जाईल. त्यातून जे पाॅझिटिव्ह येतील, त्यांना कोविड केअर सेंटरला हलविण्यात येईल. कदाचित या एकाच दिवसात पाॅझिटिव्हचा आकडा मोठा वाढेल, पण छुपे रुग्ण सापडून साखळी तोडण्याकामी मदत होणार आहे.``  
- विनोद जळक, मुख्याधिकारी - सासवड नगरपालिका

Edited By - Prashant Patil

loading image
go to top