राजगुरू महाविद्यालयात ट्रॅडिशनल डे उत्साहात
राजगुरुनगर, ता. १४ : खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालय, पॉलिटेक्निक व एमबीए कॉलेजच्या वतीने पारंपरिक दिवस (ट्रॅडिशनल डे) नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त विद्यार्थ्यांनी पौराणिक, ऐतिहासिक, प्रादेशिक वेशभूषा करत उत्स्फूर्त सहभाग घेतला. संस्थापक अध्यक्ष साहेबराव बुट्टेपाटील यांच्या पुतळ्याला विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील तरुणाई विविध रंगांच्या वेशभूषा व रंगभूषेने सजली होती. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात हॅट डे, चॉकलेट डे, मास्क डे, गॉगल डे, मिस मॅच डे, ग्रुप डे आदी उपक्रम उत्साहात साजरे झाले. ट्रॅडिशनल डे निमित्त आपले वेगळेपण दाखवताना विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरला. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मराठी, गुजराती, बंगाली, राजस्थानी व दाक्षिणात्य वेशभूषा करून त्या त्या प्रादेशिक संस्कृतीचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत रॅम्प वॉक केला.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, डॉ. शिल्पा जगताप, डॉ. पायल ओसवाल, प्रा. प्रियंका बालघरे, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, डॉ. योगेश वाळुंज, डॉ. गणेश धुमाळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. दिलीप मुळूक यांच्यासह नेत्रा बोऱ्हाडे, श्रृती हुंडारे, वैष्णवी शिंदे, स्मितल दरेकर, छकुली केदारी, आयुष गायकवाड, अभिषेक घाटे, आयुष बच्चे, जयेश बालघरे, शुभम खरडे, शुभम पवार, यश थिगळे, आदित्य बोरसे या विद्यार्थ्यांनी केले.
. RAJ12P1
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

