

Subhash and Sangeeta Panchras making traditional brooms at their home.
esaskal
पारगाव, : दिवाळीचे लक्ष्मी पुजन अवघ्या एका आठवड्यावर आल्याने. लक्ष्मी पुजनात मानाचे स्थान असणाऱ्या लक्ष्मी(केरसुणी) बनविण्याच्या कामाला वेग आला असून लोणी (ता. आंबेगाव) येथील पंचरास वाड्यातील प्रत्येक घरात केरसुण्या बनविण्याच्या कामाची लगबग सुरु आहे.
दरवर्षी पंचरास वाड्यातून विविध आकारातील नक्षीकाम केलेल्या सुमारे १५ ते २० हजार केरसुण्या ठोक व्यापाऱ्यांच्या माध्यमातुन आसपासच्या शहरामध्ये विक्रीसाठी रवाना होत असतात.