पारंपरिक साखर गाठी बनविणारे व्यावसायिक संकटात
चाकण, ता.७ : यंत्रावर बनवल्या जाणाऱ्या गाठींना मागणी वाढल्याने गुढीपाडव्यासाठी साखर गाठी बनविणारे पारंपरिक व्यावसायिक सध्या अडचणीत सापडले आहेत. वाढता उत्पादन तसेच मजुरीचा खर्च, कारागीर न मिळणे अशा अनेक समस्या व्यावसायिकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. सध्या चाकण परिसरातील ग्राहकांनी यंत्राद्वारे तयार केलेल्या साखर गाठींला पसंती मिळत असल्याने पारंपरिक गाठींकडे पाठ फिरविली आहे.
गाठ्या बनवणारे जुने पारंपरिक व्यावसायिक हा व्यवसाय कारागीर मिळत नसल्याने कमी प्रमाणात करत आहेत. साखरेच्या गाठी हाताने बनविण्याची परंपरा पिढ्यान् पिढ्या चालत आली आहे. साखरेचा पाक विशिष्ट तापमानाला तापवून, तो हाताने ओढत, ताणत गोल गाठींच्या आकारात साच्यात टाकून वाळवला जातो. पूर्वी गुढीपाडव्याच्या आठवडाभर आधीपासून या कारागिरांकडे मोठ्या प्रमाणावर मागणी असायची. मात्र, गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलली आहे. वाढलेले साखरेचे भाव, इंधन, मजुरीचा खर्च यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. त्याचबरोबर मशिनद्वारे तयार होणाऱ्या स्वस्त तसेच आकर्षक गाठी उपलब्ध झाल्याने पारंपरिक हातगाठींना स्पर्धा निर्माण झाली आहे. परिणामी पारंपरिक व्यवसायिकांचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे काही व्यवसाय बंद होत आहेत
दरम्यान, आता ग्राहक किंमत पाहून मशिनमेड गाठी विकत घेतात. हातगाठींची किंमत थोडी जास्त असली तरी त्यात दर्जा व परंपरेची चव असते, असे हॉटेल व्यावसायिक पारंपारिक गाठ्या बनविणारे रमेश वाडेकर यांनी सांगितले.
गुढीपाडव्याच्या सणाला गुढी उभारण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या साखरेच्या गाठ्यांना तुलनेत कमी मागणी असते. गाठ्यांच्या किमती अगदी २० रुपयांपासून शंभर रुपयापर्यंत आहेत. पांढऱ्या गाठ्याबरोबर विविध रंगाच्या, आकाराच्या आकर्षक गाठ्या बनवल्या जातात. त्यामुळे यंत्रावर बनविलेल्या गाठ्यांना पसंती मिळते आणि पारंपरिक गाठ्या ग्राहक कमी प्रमाणात घेतात.
- रमेश वाडेकर, पारंपरिक व्यावसायिक
10256
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

