पुणे - म्हाळुंगे-बालेवाडी येधील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल व वानवाडी येथे शनिवारी (ता.२२) होणाऱ्या ककार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यामुळे बाणेर रस्ता व लष्कर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तरी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पुणे पोलिसांच्या वाहतुक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे -
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषीजी चौकातून बाणेर रस्त्यावरुन राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकातून डावीकडे वळुन पुढे जावे
- मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरुन बाणेरकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी बालेवाडी जकातनाका चौकातून डावीकडे वळून हायस्ट्रीटमार्गे पुढे जावे
- पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी विद्यापीठ चौकातून बाणेरकडे जाण्याचे टाळावे
- संबंधित वाहनचालकांनी पाषाण रस्त्याने चांदणी चौक किंवा विद्यापीठ चौकातून औंधमार्गे पुढे जावे
- लष्कर परिसरातील रेसकोर्सजवळील पाण्याची टाकी ते टर्फ क्लब रस्ता वाहतुकीस तात्पुरत्या स्वरुपात दुतर्फा करण्यात येणार आहे.
- शनिवारी विद्यापीठ चौक ते चांदणी चौक, बाणेर रस्ता, विद्यापीठ चौक ते औंधमधील राजीव गांधी पूल या ठिकाणी अवजड वाहनांना बंदी असेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.