.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे : सिंहगड रस्त्यावरील संतोष हॉल चौकातील कोंडी सोडविण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आनंदनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी संतोष हॉल चौकातून वडगाव पुलाकडे जावे. तेथून दीडशे मीटर अंतरावर टायटन वॉच शोरुमजवळून उजवीकडे वळून स्वारगेटकडे जावे.