
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, जंगली महाराज रस्ता, गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्ता, केळकर रस्त्यासह प्रमुख रस्त्यांवरून मिरवणुका निघत असतात.
तसेच, केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाकडून ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन केले आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात मंगळवारी (ता. १९) सकाळी सहा वाजल्यापासून मिरवणुका संपेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येत आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा -
ही पदयात्रा सीओईपी अभियांत्रिकी महाविद्यालय, स. गो. बर्वे चौक, एसएसपीएमएस कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मॉडर्न चौक, झाशी राणी चौक, खंडोजी बाबा चौक, गुडलक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय मैदान अशी जाणार आहे. त्यामुळे जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत वाहतूक सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत बदल करण्यात येणार आहे.
१. जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक संचेती हॉस्पिटल चौक ते खंडोजी बाबा चौकापर्यंत आवश्यकतेनुसार बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : सीओईपी अभियांत्रिकी महाविद्यालय चौकातून येणारी वाहने डावीकडे वळून कामगार पुतळा मार्गे, जवाहरलाल नेहरू रस्ता आणि महात्मा गांधी रस्त्याने इच्छित स्थळी जातील. बाणेर, पाषाण, कोथरूड, कर्वे रस्त्याकडे जाणारी वाहने उजवीकडे वळून सिमला ऑफीस चौकमार्गे वीर चाफेकर उड्डाणपुलावरून आणि सेनापती बापट रोडने इच्छित स्थळी जातील. (सिमला ऑफिस चौक ते संचेती चौक हा मार्ग दुहेरी वाहतूक करण्यात येत आहे.)
२) फर्ग्युसन महाविद्यालयासमोरील रस्त्यावरील वाहतूक खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार, वीर चाफेकर चौकापर्यंत आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग : कोथरूड, कर्वे रस्ता, खंडोजी बाबा चौकात येणारी वाहने एसएनडीटी कॉर्नरमार्गे विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्तामार्गे आणि नळस्टॉप चौक येथून उजवीकडे वळून कन्हेरी रस्तामार्गे इच्छित स्थळी जातील.
३) लोकमान्य टिळक रस्त्यावरून खंडोजी बाबा चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग : लोकमान्य टिळक (अलका टॉकीज) चौकातून वाहने लालबहादूर शास्त्री रस्त्याने सेनादत्त चौक, नळस्टॉप मार्गे इच्छित स्थळी जातील.
४) केळकर रस्त्यावरून झेड ब्रिजमार्गे डेक्कनकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग : गरुड गणपती चौक, लोकमान्य टिळक चौक, लालबहादूर शास्त्री रस्त्याने इच्छित स्थळी जातील.
५) भिडे पुलमार्गे डेक्कनकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग : झेड ब्रिज, गरुड गणपती चौक, लोकमान्य टिळक चौक, लालबहादूर शास्त्री रस्त्याने इच्छित स्थळी जातील.
वाहन पार्किंगबाबत-
संगमवाडी
१) खडकी, येरवडा आरटीओ कार्यालयाकडून येणाऱ्या वाहनांनी संगमवाडी पार्किंग येथे वाहने पार्किंग करावीत.
२) कर्वे रस्ता, कोथरूडकडून येणाऱ्या वाहनचालकांनी अलका टॉकिज चौकातून डावीकडे वळून नदीपात्रात वाहने पार्क करावीत. (व्हीआयपी, संयोजक आणि क्रीडा अधिकारी यांनी वाहने फर्ग्युसन महाविद्यालयातील पार्किंगमध्ये लावावीत)
३) स्वारगेट, हडपसर, दांडेकर पुलाकडून येणाऱ्या वाहनचालकांनी सेनादत्त मार्गे अलका टॉकीज चौकातून नदी पात्रातील पार्किंगमध्ये पार्क करावीत.
४) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पाषाण, बाणेर रस्त्याने येणाऱ्या वाहनचालकांनी वाहने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर पार्क करावीत.
शिवजयंती मुख्य मिरवणूक मार्गावरील वाहतुकीत बदल
१९ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्त्यावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीत बदल करण्यात येत आहे.
1) जिजामाता चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, लोकमान्य टिळक रस्त्याने इच्छित स्थळी जातील. (जय शिवाजी जय भारत पदयात्रा संपल्यानंतर)
2) स. गो. बर्वे चौकातून पुणे महापालिका भवनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौकातून डावीकडे वळून इच्छित स्थळी जातील (जय शिवाजी जय भारत पदयात्रा संपल्यानंतर)
3) गणेश रस्ता, दारूवाला पुलाकडून फडके हौद चौक, जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातून इच्छित स्थळी जातील.
4) केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदिर चौकमार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येत आहे.
5) मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर असताना सोन्या मारुती चौकातून पुढे जाईपर्यंत आवश्यकतेनुसार लक्ष्मी रस्त्यावरील वाहने संत कबीर चौकातून वळविण्यात येईल.
6) पूरम चौकातून बाजीराव रस्त्यावरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पूरम चौकातून लोकमान्य टिळक रस्त्याने अलका टॉकीज चौकातून फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने इच्छित स्थळी जातील. (जय शिवाजी जय भारत पदयात्रा संपल्यानंतर)
7) मिरवणुका सुरु झाल्यानंतर अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे आणि बाजीराव रस्त्याने फुटका बुरुजाकडे न जाता सर्व वाहने केळकर रस्त्याने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील. तसेच सेवासदन चौकाकडून अप्पा बळवंत चौकाकडे न जाता लक्ष्मी रस्तामार्गे इच्छित स्थळी जातील.
8) मिरवणुका गाडगीळ पुतळ्याच्या पुढे गेल्यानंतर सर्व वाहने स्वातंत्र्यवीर सावरकर भवन पुलावरून बालगंधर्व नाट्यगृहाच्या बाजूने किंवा टकले हवेली चौकामार्गे इच्छितस्थळी जातील.
9) मिरवणुका गाडगीळ पुतळ्याच्या पुढे गेल्यानंतर वाहने शनिवारवाड्याकडे न जाता कॉसमॉस बँक जंक्शन, स्वातंत्र्यवीर सावरकर भवन पूल ते बालगंधर्व, लोकमान्य टिळक पुलमार्गे महापालिकेकडे किंवा टकले हवेली चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.