Pune News : छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त वाहतुकीत बदल

वढू बुद्रूक येथे छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त जड वाहतूक, माल वाहतूक (ट्रक, टेम्पो) आदी वाहनांच्या मार्गामध्ये बदल करण्यात येत आहे.
Highway Traffic
Highway Trafficsakal
Updated on

पुणे - शिरूर तालुक्यातील वढू बुद्रूक येथे छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त २८ मार्च रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते २९ मार्च सकाळी दहा वाजेपर्यंत जड वाहतूक, माल वाहतूक (ट्रक, टेम्पो) आदी वाहनांच्या मार्गामध्ये बदल करण्यात येत आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी गुरुवारी काढला आहे.

शंभू भक्तांची वाहने वगळता कोरेगाव भीमाच्या बाजूने येणारी आणि वढू बुद्रूकमार्गे चाकण किंवा पाबळला जाणारी अवजड वाहतूक कोरेगाव भीमा- सणसवाडी-शिक्रापूर गॅस फाटा- वाजेवाडी चौफुला मार्गे चाकण, पाबळ बाजूकडे जाईल.

तसेच, चाकण, पाबळ बाजूकडून येणारी आणि वढू बुद्रूक कोरेगाव भीमा मार्गे पुण्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक वाजेवाडी चौफुला- गॅस फाटा- शिक्रापूर- सणसवाडी- कोरेगाव भीमामार्गे पुणे शहराकडे जाईल.

कोरेगाव भीमाकडून येणारी शंभू भक्तांची वाहने कोरेगाव भीमा- वढू मार्गावरील माहेर संस्थेजवळ असणाऱ्या थांब्याच्या ठिकाणापुढे (स्टॉपेज पॉइंट) जाण्यास मनाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Ganesh Visarjan 2026 In Wagholi Traffic Changes On Pune Ahilyanagar Road Alternative Routes And Market Closure
Sardesai Wada in Kasba Sangameshwar
400-kg Panchadhatu Meghdambari installed at Chhatrapati Sambhaji Maharaj’s memorial in Kanakagiri, Karnataka.
Suhas Shirsath Makes First Demand As MLC Seeks Land For Sambhaji Maharaj Equestrian Statue In Phulambri
Marathi News Esakal
www.esakal.com