पुणे - कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी म्हणून महापालिकेने खासगी मालकाची जागा ताब्यात घेतली. त्यानंतर १५ दिवसात रस्ता खुला केला जाईल असा दावा केला होता. पण चारपाच महिने उलटून गेले तरीही येथील रस्ता खुला झालेला नाही. शिवाय वाहतूक पोलिस उपस्थित नसल्याने रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडीला सामारे जावे लागत आहे.