
जुनी सांगवी : सांगवी फाटा ते रावेत बीआरटीएस मार्गावर पिंपळे निलख येथील रक्षक सोसायटी चौकात भुयारी मार्ग (सब-वे) उभारण्यात येत आहे. भुयारी मार्ग खोदकाम व उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे रक्षक चौकात रस्ता अरुंद झाल्याने परिणामी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.