
घोरपडी : पुणे-सोलापूर रस्त्यावर फातिमानगर चौकात सतत वाहतूक कोंडी होत असल्याने या कोंडीवर उपाय म्हणून मागील आठ महिन्यांपासून चौक बंद केला आहे, मात्र या बदलामुळे वाहतूक कोंडी अधिक वाढली आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण झाले असून, वयस्कर आणि शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.