Chakan Traffic Issues : चाकणमधील कोंडी ठरतेय डोकेदुखी; उद्योग वाढला पण रस्ते तसेच
Pune-Nashik Highway : चाकण परिसरात दररोज लाखो वाहनांची वर्दळ असून, रस्त्यांची दुरवस्था, बेशिस्त वाहतूक व नियोजनशून्य कारभारामुळे वाहतूक कोंडी भीषण झाली आहे.
पुणे : चाकणमधील पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असून अरुंद रस्ते आहेत. गेली २५ वर्षे मार्गांची कामे झालेली नाहीत. औद्योगिक वसाहतीमुळे दररोज या मार्गांवर एक लाख वाहने ये-जा करतात.