तळेगाव स्टेशन - मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे जाणा-या मोर्च्यामुळे गुरुवारी (ता.२८) तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.